AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खान गद्दार त्याला बांगलादेशात पाठवा… अभिनेत्याचा तो मोठा निर्णय, लोकांमध्ये संतापाची लाट, थेट

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असलेले नाव आहे. मात्र, आता शाहरुख खान मोठ्या अडचणीत फसला. हेच नाही तर त्याच्या एका निर्णयामुळे त्याला थेट बांगलादेशात पाठवण्याची मागणी केली जात आहे.

शाहरुख खान गद्दार त्याला बांगलादेशात पाठवा... अभिनेत्याचा तो मोठा निर्णय, लोकांमध्ये संतापाची लाट, थेट
Shah Rukh Khan
| Updated on: Jan 02, 2026 | 8:00 AM
Share

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान चांगलाच अडचणीत फसला. हेच नाही तर शाहरुख खानला बांगलादेशात पाठवण्याची जोरदार मागणी देखील केला जातंय. बांगलादेशात सतत हिंदूंवर अन्याय होत असताना शाहरुख खान त्याच्या एका निर्णयाने अडचणीत आला असून शाहरुख खान विरोधात लोकांमधील संताप वाढताना दिसतोय. भाजपाचे नेते संगीत सोम यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानबद्दल केलेल्या विधानाने मोठा गदारोळ सुरू झाला. हिंदू महासभेच्या एका सदस्याने वादग्रस्त विधान केले. जिल्हाध्यक्ष मीरा राठोड यांनी शाहरुख खानची जीभ कापणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. या वादात BCCI चीही भूमिका महत्वाची आहे. बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिझुर रहमानमुळे शाहरुख खान वादात सापडला.

अभिनेता शाहरुख खानने आपल्या आयपीएल संघासाठी बांगलादेशी खेळाडूला विकत घेण्याच्या निर्णयाविरोधात हिंदू महासभेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शाहरुख खानने आपल्या आयपीएल संघात बांगलादेशी खेळाडूला खरेदी केल्याने लोकांमध्ये मोठा रोष बघायला मिळतंय. हा विरोध इतका जास्त वाढला की, शाहरुख खान याला बांगलादेशात पाठवण्याची मागणी केली जातंय.

दिनेश फलाहारी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटले की, शाहरुख खानला बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराची माहिती आहे. मात्र, त्यानंतरही त्याने बांगलादेशी क्रिकेटपटू रहमानला लाखो रुपये देऊन विकत घेतले आहे. हेच नाही तर  शाहरुख खान याचे संबंध बांगलादेशातील दहशतवाद्यांसोबतही असून शकतात, असे त्यांनी पत्रात म्हटले. देशातील शाहरुख खानसारख्या सर्व व्यक्तींची यादी तयार करून त्यांना बांगलादेशात पाठवले जावे, असेही त्यांनी म्हटले.

शाहरुख खान याने त्याच्या संघात बांगलादेशी खेळाडू घेतल्याने रोष वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंसाचार वाढला असून हिंदूंवर प्रचंड अन्याय होत आहे. कट्टरपथांकडून हिंदूंची भर रस्त्यावर हत्या केली जात आहे. दीपू नावाच्या हिंदू युवकाची भर रस्त्यावर हत्या बांगलादेशात झाल्यानंतर अनेक कलाकारांनी याचा निषेध केला. यादरम्यान शाहरुख खान याने त्याच्या संघात बांगलादेशी खेळाडूंना घेतल्याने लोकांचा रोष वाढताना दिसतोय.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा