अवघ्या दोनच दिवसांत सुगंधा मिश्रा-संकेत भोसलेचे लग्न वादात! पोलिसांनी दाखल केला FIR

लोकप्रिय कॉमेडियन आणि गायिका सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) हिने अभिनेता संकेत भोसले (Sanket Bhosle) याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. पण लग्नाच्या काहीच दिवसांत ही कॉमेडियन जोडी अडचणीत सापडली आहे.

अवघ्या दोनच दिवसांत सुगंधा मिश्रा-संकेत भोसलेचे लग्न वादात! पोलिसांनी दाखल केला FIR
संकेत आणि सुगंधा

मुंबई : लोकप्रिय कॉमेडियन आणि गायिका सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) हिने अभिनेता संकेत भोसले (Sanket Bhosle) याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. पण लग्नाच्या काहीच दिवसांत ही कॉमेडियन जोडी अडचणीत सापडली आहे. वास्तविक सुगंधा मिश्रावर लग्नाच्या वेळी कोरोना मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम मोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. संकेत आणि सुगंधाचा विवाह सोहळा पंजाबमध्ये पार पडला. जालंधरमध्ये या लग्नाच्या वेळी कोरोनाचे नियम मोडल्याबद्दल फागवारा पोलिसांनी सुगंधाविरोधात एफआयआर दाखल केला आहे (Punjab Police file FIR against Sugandha Mishra and Sanket Bhosle for violating Corona Guidelines).

पोलिस अधिकारी यांनी संकेत भोसले यांच्या कुटुंबीयांविरूद्ध देखील तक्रार दाखल केली आहे. अशी बातमी आहे की, सुगंधा आणि संकेत यांच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांनी 26 एप्रिल रोजी लग्न केले. कोव्हिड मार्गदर्शक सूचनांनुसार लग्नात केवळ 40 लोक उपस्थित राहू शकतात. परंतु, आता असा आरोप केला जात आहे की, सुगंधा-संकेतच्या विवाहात 100हून अधिक लोक उपस्थित होते. तथापि, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

लग्नानंतर जोडीने शेअर केला क्युट व्हिडीओ

लग्नानंतर संकेत भोसले याने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संकेत बेडवर पडलेला दिसला आहे आणि त्याची बायको सुगंधा त्याला गुड मॉर्निंग म्हणतेय, तिच्या हातात चहाचा कप आहे आणि तिने विचारते की चहा प्यायचा आहे का?  त्यानंतर ती संकेतलाच चहा बनवायला सांगते. लग्नानंतरचा त्यांचा हा क्युट मजेशीर व्हिडीओ सध्या खूपच लाईक केला जात आहे (Punjab Police file FIR against Sugandha Mishra and Sanket Bhosle for violating Corona Guidelines).

डेटिंगच्या चर्चेनंतर थेट लग्नाची बातमी!

अभिनेत्री सुगंधा मिश्रा ही एक बहु प्रतिभावान व्यक्तिमत्व आहे. ती सुप्रसिद्ध कॉमेडीयन असण्याबरोबरच एक प्रसिद्ध गायक आणि उत्तम होस्ट देखील आहे. ती कपिल शर्माच्या शोमध्ये बराच काळ दिसली होती, परंतु गेल्या वर्षी ती अचानक या शोमधून गायब झाली. दुसरीकडे संकेत भोसले देखील उत्तम कॉमेडीयन आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये तो अनेक सेलिब्रिटींची मिमिक्री करताना दिसला होता. त्याने केलेली अभिनेता संजय दत्तची मिमिक्री चाहत्यांना खूप आवडते. सुगंधा आणि संकेतच्या डेटिंगच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून समोर येत होत्या, पण आता या दोघांनीही आपल्या रसिकांना लग्नाची बातमी देऊन आनंदित केले आहे.

सुगंधाची ‘बायको’ होण्याची जोरदार तयारी!

लग्नानंतर आता सासरी आल्यावर सुगंधाने महाराष्ट्रीयन होण्याची तयारी सुरू केली आहे. ती नवीन प्रथा शिकण्यात व्यस्त झाली आहे. लग्नानंतर पूजा सुगंधाच्या सासरच्या घरी ठेवली गेली, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नवीन विवाहित जोडपे महाराष्ट्रीयन अवतारात दिसले आहे. सुगंधाने पारंपारिक नथ, नऊवारी साडी आणि केसांमध्ये छानसा गजरा घातला होता.

(Punjab Police file FIR against Sugandha Mishra and Sanket Bhosle for violating Corona Guidelines)

हेही वाचा :

Photo : ‘यू ओन्ली लिव्ह वन्स’, कोरोना परिस्थितीत जॅकलिनकडून मदतीचा हात

गायक अरिजित सिंहची आई रुग्णालयात, रक्ताची गरज, अभिनेत्रीने सोशल मीडियावर मागितली मदत

Published On - 6:45 pm, Thu, 6 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI