AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : बॉक्स ऑफिसवर ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा जयकार! ‘या’ विक्रमापासून काही पावलं दूर

Raja Shivaji Box Office Collection : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सोळाव्या दिवशीही कमाईची गती कायम ठेवली आहे. ऐतिहासिक कथानक असलेला हा चित्रपट लवकरच कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठणार आहे.

Raja Shivaji : बॉक्स ऑफिसवर 'राजा शिवाजी' चित्रपटाचा जयकार! 'या' विक्रमापासून काही पावलं दूर
Riteish Deshmukh in Raja ShivajiImage Credit source: Instagram
| Updated on: May 17, 2026 | 8:10 AM
Share

अभिनेता रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाला सर्वच स्तरांतून प्रशंसा मिळतेय. या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेशनेच केलं असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिकासुद्धा त्यानेच साकारली आहे. रितेश ही भूमिका चोख साकारू शकणार का, अशी सुरुवातीला साशंकता असूनही या चित्रपटाने प्रेक्षकांना प्रभावित केलं. हा चित्रपट स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित आगे. नवीन चित्रपटांमुळे सध्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होत असला तरी दररोज याच्या कमाईचा आकडा 100 कोटींच्या दिशेने पुढे सरकत आहे.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 52.65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या आठवड्यात कमाईचा हा आकडा 24.30 कोटी रुपयांवर पोहोचला. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, प्रदर्शनाच्या 16 व्या दिवशी या चित्रपटाने 2172 शोजमधून 2.70 कोटी रुपये कमावले आहेत. यापैकी मराठी भाषेत 2.30 कोटी रुपये आणि हिंदीत 40 लाख रुपयांची कमाई झाली. त्यामुळे भारतातील एकूण कमाईचा (ग्रॉस) आकडा 96 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर नेट कलेक्सन 86 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. लवकरच हा चित्रपट 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठणार असल्याचं चित्र दिसत आहे.

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली असून दुसऱ्या आठवड्याचा शेवट 84.70 कोटी रुपयांच्या कमाईने केला होता. विक्रमी ओपनिंगसह इतिहास रचल्यानंतर आणि कोणत्याही मराठी चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा पहिला आठवडा दिल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या महाकाव्याने प्रेक्षकांच्या प्रचंड कौतुकाच्या जोरावर तिसऱ्या आठवड्यातही आपली सातत्यपूर्ण घोडदौड कायम ठेवली आहे.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटासाठी रितेश गेल्या दहा वर्षांपासून काम करत होता. दिग्दर्शनाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेण्याआधी त्याने मराठी चित्रपटसृष्टीतील दोन मोठ्या दिग्दर्शकांकडे विचारणा केली होती. याविषयी त्याने एका मुलाखतीत सांगितलं, “2016 मध्ये आधी माझे मित्र आणि दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासोबत या चित्रपटाची घोषणा झाली होती. त्यावेळी ते दिग्दर्शन करणार होते. दुर्दैवाने काही गोष्टी जुळून आल्या नाहीत आणि तो चित्रपट रखडला. तीन वर्षांनंतर 2019 मध्ये नागराज मंजुळे यांच्यासोबत मी ‘राजा शिवाजी’ चित्रपट बनवण्यासाठी हातमिळवणी केली. तेव्हासुद्धा आम्ही घोषणा केली, पण नेमका कोविड आला. त्यानंतर काही वर्षे अशीच गेली आणि काहीच काम झालं नाही.” अखेर रितेशने या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचं ठरवलं.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.