AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajesh Khanna : राजेश खन्नाच्या नावाने दहीहंडी, बाळासाहेबांसोबत सभेत… राजेश खन्नाचे मराठी कनेक्शन माहीत आहे का?

राजेश खन्ना, बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार, यांचा स्मृतीदिन आज आहे. गिरगावातल्या मराठी घरात वाढलेले, ते उत्तम मराठी बोलत होते. त्यांचे मराठी चित्रपटांशीही कनेक्शन होते; "सुंदरा सातारकर" मध्ये त्यांनी पाहुणा कलाकार म्हणून काम केले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे जवळचे नाते होते.

Rajesh Khanna : राजेश खन्नाच्या नावाने दहीहंडी, बाळासाहेबांसोबत सभेत... राजेश खन्नाचे मराठी कनेक्शन माहीत आहे का?
राजेश खन्नाचे मराठी कनेक्शनImage Credit source: social media
| Updated on: Jul 18, 2025 | 11:48 AM
Share

भारतातील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना ऊर्फ काका यांचा आज स्मृती दिन आहे. 18 जुलै 2012 रोजी राजेश खन्ना यांनी या जगाचा निरोप घेतला. आपल्या अदांनी सिनेरसिकांच्या मनावर राजेश खन्ना यांनी राज्य केलं. त्यावेळी तरुणाईवर त्यांची प्रचंड क्रेझ होती. राजेश खन्ना यांचा सिनेमा म्हटलं की काही क्षणात तिकीटांची विक्री व्हायची. ब्लॅकने सुद्धा त्यांच्या सिनेमाची तिकीट मिळायची नाही. पंजाबवरून आलेल्या आणि गिरगावात राहिलेले राजेश खन्ना खऱ्या अर्थाने बॉलिवूडचे सम्राट होते. राजेश खन्ना यांचं मराठीशी खास नातं होतं. प्रसिद्ध सिने समीक्षक दिलीप ठाकूर यांनी राजेश खन्ना यांच्या मराठीपणाच्या जागवलेल्या या आठवणी.

सुपरस्टार राजेश अमृतसर ( पंजाब) वरुन मुंबईत आल्यावर मराठमोळ्या गिरगावातील ठाकूरव्दार नाक्यावरील सरस्वती निवासमधील आपल्या काकांकडे राह्यचा. आजही तेथे चुन्नीलाल खन्ना ( रेल्वे कॉन्ट्रॅक्टर) हा फलक पाह्यला मिळतोय.

राजेश खन्नाच्या नावाने दहीहंडी

मराठमोळ्या गिरगावात राहिल्याने राजेश खन्नाचे मराठी अतिशय उत्तम होते. त्याच्या खार येथील कार्यालयात मराठी वृत्तपत्र आणि साप्ताहिक पाह्यला मिळत. सत्तरच्या दशकात शिवसेना वर्धापनदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे आणि राजेश खन्ना व्यासपीठावर एकत्र पाह्यला मिळाले. कालांतराने राजेश खन्नाने मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्याचा फोटो सामना वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर प्रसिद्ध झाला. आजही गिरगावातील सरस्वती निवास येथे राजेश खन्नाच्या नावाने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. दहीहंडी उभारली जाते.

राजेश खन्नाने मराठी चित्रपटात भूमिका साकारण्याचा योग आला आहे. श्री मंगेश चित्र या बॅनरखालील प्रभाकर निकळंकर आणि नारायण गुजर निर्मित व प्रभाकर निकळंकर दिग्दर्शित ” सुंदरा सातारकर ” ( १९८१) या चित्रपटात राजेश खन्नाने पाहुणा कलाकार म्हणून भूमिका साकारली. मेहबूब स्टुडिओत या दृश्याचे चित्रीकरण झाले होते. या चित्रपटात अशोक सराफ, उषा नाईक, रमेश भाटकर, सुहास भालेकर, बाळ कर्वे, दाजी भाडवडेकर, वसंत इंगळे इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत.

राजेश खन्नाची भूमिका असलेला शक्ती सामंता दिग्दर्शित ‘आराधना ‘( १९६९) गिरगावातील रॉक्सी थिएटरमध्ये रिलीज झाला तोच सुपर हिट ठरला आणि काही आठवड्यातच राजेश खन्नाने गिरगाव सोडले आणि तो वांद्र्याच्या कार्टर रोडवर “आशीर्वाद ” बंगल्यात राह्यला गेला. पूर्वी मराठमोळ्या गिरगावात राहिल्याने राजेश खन्ना चांगले मराठी बोलायचा. त्याच्या हिंदी चित्रपटाच्या सेटवर त्याला भेटायला आलेल्या महाराष्ट्रीय मीडियाशी तो आवर्जून मराठीत बोलायचा. राजेश खन्नाच्या हस्ते काही मराठी चित्रपटाचे मुहूर्त होण्याचाही योग आला आहे.

– दिलीप ठाकूर (लेखक ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आहेत)

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.