Rakul Preet : रियाच्या चौकशीत ड्रगप्रकरणात नाव, आता रकुलप्रीत सिंहची हायकोर्टात धाव

ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने अभिनेत्री रकुलप्रीत सिंह आता हायकोर्टात पोहोचली आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीत रकुल प्रीत आणि सारा अली खानचे नाव आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

Rakul Preet : रियाच्या चौकशीत ड्रगप्रकरणात नाव, आता रकुलप्रीत सिंहची हायकोर्टात धाव

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने अभिनेत्री रकुलप्रीत सिंह आता हायकोर्टात पोहोचली आहे. अभिनेता सुशांत सिंह राज्यपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना NCB ने ड्रग्ज अँगल तपासण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने सुशांतची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीत रकुल प्रीत आणि सारा अली खानचे नाव आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यामुळेच आता रकुलप्रीतने हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. (Rakul Preet Moves Delhi HC Against Media Trial In Drugs Probe)

इतकंच नाही तर रकुलने मीडिया ट्रायलविरोधात केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाकडेही धाव घेतली आहे. रकुलने आपल्याविरुद्ध मीडिया चुकीची माहिती पसरवत असल्याचा दावा केला आहे.

एनसीबीने रियाची चौकशी केल्यानंतर, तिच्या हवाल्याने माझं आणि सारा अली खानचं नाव ड्रग्ज प्रकरणात घेतलं जात आहे. त्यामुळे मीडिया ट्रायल होत असून, प्रतिमा खराब होत असल्याचा दावा रकुलने केला आहे.

हायकोर्टाकडून मीडियाला धीर धरण्याचा सल्ला

रकुल प्रीतने केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने मीडियाला शांतता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नॅशनल ब्रॉडकॉस्ट असोसिएशन, प्रसार भारती आणि प्रेस काऊन्सिलने मीडियाला अंतरिम मार्गदर्शिका देण्यास सांगितले आहे.

सारा अली खानने सुशांतसिंह राजपूतसोबत ‘केदारनाथ’ चित्रपटात काम केलं होतं. तर अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने अनेक दाक्षिणात्य सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. ‘अय्यारी’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. तर अजय देवगनसोबत दे दे प्यार दे, मरजांवा असे काही चित्रपट केले आहेत.

(Rakul Preet Moves Delhi HC Against Media Trial In Drugs Probe)

 संबंधित बातम्या 

ड्रग्ज कनेक्शनमध्ये रियाकडून बॉलिवूड अभिनेत्रींची नावे, सारा अली खान आणि रकुल प्रीत NCB च्या रडारवर?

व्हिसेरा रिपोर्टची प्रतीक्षा, सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण उलगडणार?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *