AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंधाऱ्या जागी गाडी थांबवून केली किळसवाणी मागणी..; ऐकताच थरथर कापू लागली ‘रामायण’ फेम अभिनेत्री

'रामायण' फेम अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या धक्कादायक अनुभवाचा खुलासा केला. दिग्दर्शकाने अंधाऱ्या ठिकाणी गाडी थांबवली आणि तिच्याकडे नको ती मागणी केली.

| Updated on: Nov 16, 2026 | 12:21 PM
Share
मनोरंजनविश्वात झगमगाट, प्रसिद्धी आणि पैसा दिसत असला तरी या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक कलाकारांना वेगवेगळ्या कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. विशेषतः करिअरच्या सुरुवातीला अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचसारख्या वाईट अनुभवांना सामोरं जावं लागतं.

1 / 7
आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि 'रामायण' मालिकेत सीतेची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री देबिना बॅनर्जी हिनेही तिच्यासोबत घडलेला असाच एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. या प्रसंगामुळे ती प्रचंड घाबरली होती. नुकतंच तिने अभिनेत्री मनीषा राणीच्या पॉडकास्टमध्ये हा अनुभव सांगितला.

2 / 7
देबिना बॅनर्जीने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील हा प्रसंग आठवला. त्यावेळी ती दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत काम करत होती. एका दिग्दर्शकाने तिला संध्याकाळी सोबत येण्यास सांगितलं. त्यावेळी देबिना खूप लहान होती आणि अशा परिस्थितीत स्पष्टपणे नकार देणंही तिला माहीत नव्हतं.

3 / 7
दिग्दर्शक गाडी चालवत असताना तिला काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव होत होती. तिच्या मनात नकारात्मक विचार येत होते. त्यानंतर अचानक त्याने एका अंधाऱ्या ठिकाणी गाडी थांबवली आणि तिला किस करण्यास सांगितलं. त्याची ही मागणी ऐकून देबिना पूर्णपणे हादरली.

4 / 7
या प्रसंगाबद्दल सांगताना देबिना म्हणाली की, त्यावेळी तिला प्रचंड भीती वाटत होती. हा माणूस आपल्याला मारून टाकेल की काय, असे विचार तिच्या मनात येत होते. ती अक्षरशः थरथर कापत होती. मात्र, तिने धैर्य दाखवत त्याला आपण या गोष्टीसाठी कम्फर्टेबल नसल्याचं सांगितलं.

5 / 7
तिच्या मते, त्या वयात अशा परिस्थितीला कसं सामोरं जायचं, याची पुरेशी समज नव्हती. त्यामुळे हा अनुभव तिच्यासाठी अत्यंत धक्कादायक होता. देबिनाने पुढे सांगितलं की, गुरमीत चौधरी तिच्या आयुष्यात आल्यानंतर तिला खऱ्या अर्थाने सुरक्षिततेची भावना मिळाली.

6 / 7
दोघांनी 'रामायण' मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेत गुरमीतने प्रभू श्रीरामांची, तर देबिनाने सीतेची भूमिका साकारली होती. मालिकेतील जोडी पुढे खऱ्या आयुष्यातही विवाहबंधनात अडकली. आज हे दोघं दोन मुलींचे आई-बाबा आहेत.

7 / 7
Follow Us
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू

मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट