रणबीर कपूरचे ऐश्वर्या रायबद्दल धक्कादायक विधान, म्हणाला, तिच्यासोबत मी..
Aishwarya Rai : बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या राय हिने एक मोठा काळ नक्कीच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये जबरदस्त आणि धमाकेदार भूमिका केल्या आहेत. सध्या ऐश्वर्या राय ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या रिलेशनबद्दल विविध चर्चा या सातत्याने बघायला मिळत आहेत. ऐश्वर्या राय हिने किंवा अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या रिलेशनवर भाष्य करणे टाळलेच आहे. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्या वाढदिवसाच्या दिवशी एक अत्यंत खास अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. ज्यानंतर घटस्फोटाच्या चर्चा कुठेतरी कमी झाल्याचे बघायला मिळाले.
ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर यांनी ऐ दिल है मुश्किल या चित्रपटात एकसोबत काम केले. करण जोहरने रणबीरला थेट या चित्रपटात संधी दिली. विशेष म्हणजे या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर यांचा रोमांन्स देखील बघायला मिळाला. याबद्दल थेट पणे बोलताना रणबीर कपूर हा दिसला. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिच्यासोबत काम करण्याचा अनुभवही रणबीर कपूरने शेअर केला.
रणबीर कपूर याची व्हायरल होत असलेली ही मुलाखत तशी जुनीच आहे. मात्र, सध्या ती चांगलीच चर्चेत आलीये. रणबीर कपूर म्हणाला की, कोणाला आवडणार नाही ऐश्वर्या राय हिच्यासोबत रोमांन्स करायला? माझ्या करिअरमधील तो मोठा क्षण होतो जे करणने मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. या चित्रपटामुळे माझ्यात आणि ऐश्वर्यात एक चांगले रिलेशन तयार झाले.
मला तर सुरूवातीला वाटले की, माझ्यासोबत काम करण्यास ऐश्वर्या थेट नकार देणार. परंतू तसे झाले नाही. ऐ दिल है मुश्किल चित्रपटात ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर यांचा रोमांन्स बघायला मिळाला. विशेष म्हणजे चाहत्यांना ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर यांची जोडी देखील चांगलीच आवडली. धमाकेदार भूमिका या चित्रपटात या दोघांनी केल्या.
अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर ऐश्वर्या राय ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. ऐश्वर्या राय ही कमाईमध्ये अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींना आरामात मागे टाकते. जाहिरातींमधून कोट्यवधींची कमाई ऐश्वर्या राय ही करते.
