सैफ अली खानच्या पहिल्या पत्नीबाबत करिना कपूर थेट म्हणाली की, मला तिच्यासोबत मैत्री…
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्यात घटस्फोट झाल्यानंतर सैफने अभिनेत्री करिना कपूर सोबत विवाह केला होता. त्यांचा विवाह झाला तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. कारण सैफ आधीच विवाहित होती. पण त्यांचे पहिले लग्न टिकू शकले नव्हते. घटस्फोट झाल्यानंतर सैफ अलीने अनेक खुलासे केले होते. नंतर करिनाने ही त्यावर प्रतिक्रिया दिली होती.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर हिने आपल्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले. सैफ अली खानचे हे दुसरे लग्न होते. त्याचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंग सोबत झाले होते. जी सैफ पेक्षा अनेक वर्षांनी मोठी होती. दोघांना दोन मुलं पण आहेत. नंतर सैफ अली खानने करीना कपूरशी लग्न केले आणि आता दोघांना दोन मुले आहेत.
करीना कपूरने 2008 मध्ये पीपल मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगबद्दल प्रतिक्रिया दिली होती. करीना कपूर म्हणाली होती की, “मला अमृताचा नेहमी सन्मान हवा आहे आणि माझ्या आई-वडिलांनी मला हेच शिकवलं आहे. हे फक्त लग्न होतं जे यशस्वी होऊ शकलं नाही.”
करीना कपूर पुढे बोलते की, “मी नेहमीच सैफ अली खानला अमृताशी मैत्री करण्यास सांगितले आहे कारण मला वाटते की ते खूप चांगले होईल. मला वाटते की त्यांना फक्त वेळेची गरज आहे. त्यांना दोन प्रेमळ मुले आहेत.”
पुढे बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मी अमृता सिंगची खूप मोठी फॅन आहे आणि मी तिला कधीच भेटले नाही. पण मी तिला तिच्या चित्रपटांमधून चांगले ओळखते. माझ्यासाठी अमृता सिंग नेहमीच सैफ अली खानच्या आयुष्याचा एक भाग राहिली आहे. ती एक महत्त्वाचे स्थान असेल आणि मी हे सैफला सांगितले आहे कारण ती त्याची पहिली पत्नी आणि त्याच्या मुलांची आई आहे.”
सैफ अली खान आता करीना कपूरसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. याआधी अभिनेत्याचे लग्न अमृता सिंगसोबत झाले होते. मात्र, लग्नाच्या 13 वर्षांनंतर 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. एकदा एका मुलाखतीत सैफने अमृता सिंगसोबतचे त्याचे लग्न, त्यांचा घटस्फोट आणि नवीन प्रेम शोधल्याबद्दल खुलासा केला होता.