Tu Tu Main Main मालिका पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज? नवीन कलाकारांसोबत होणार श्रीगणेशा
छोड्या पडद्यावर पुन्हा सासू - सुनेमध्ये बिनसणार... 'या' नव्या कलाकारांसोबत 'तू तू मैं मैं' मालिकेचा होणार श्रीगणेशा... सर्वत्र मालिकेच्या चर्चा...

मुंबई : एक काळ असा होता जेव्हा ‘तू तू मैं मैं’ मालिकेने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. १९९४ साली ऑनएयर झालेली ‘तू तू मैं मैं’ मालिका ९० त्या दशकात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रचंड लोकप्रिय होती. ‘तू तू मैं मैं’ कॉमेडी मालिकेमध्ये अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि दिवंगत अभिनेत्री रीमा लागू महत्त्वाच्या भूमिकेत झळकल्या होत्या. ‘तू तू मैं मैं’ मालिकेची चर्चा आजही चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते. ‘तू तू मैं मैं’ मालिकेत सासू – सुनेतील भांडणं पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असायचे. शिवाय रीमा लागू आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या अभिनयाचं देखील तेव्हा सर्वत्र कौतुक झालं. सासू – सुनेत होत असलेली भांडणं कोणाला आवडत नाहीत, पण मालिकेत रीमा लागू आणि सुप्रिया पिळगावकर यांच्यात होणारे वाद पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे.
‘तू तू मैं मैं’ मालिका सर्वात आधी १९९४ साली डीडी मेट्रो आणि त्यानंतर म्हणजे १९९६ मध्ये स्टार प्लसच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस यायची. सासू – सुने यांच्यामध्ये होणारे कॉमेडी वाद चाहत्यांचं प्रचंड मनोरंजन करत होते. अनेक वर्ष प्रेक्षकांना पोट धरुन हसवल्यानंतर ‘तू तू मैं मैं’ मालिकेने २००० मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. अशात मिडीया रिपोर्टनुसार, ‘तू तू मैं मैं’ पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘तू तू मैं मैं’ जुन्या मालिकेच्या आधारावर नवीन मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी याबाबद मोठा खुलासा केला आहे. सचिन पिळगावकर म्हणाले, ‘मालिकेचा सिक्वल येणार आहे. यावेळी काही नवीने चेहरे चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. जुन्या भागात सुप्रिया सून होत्या… यावेळी सुप्रिया सासूच्या भूमिकेत दिसणार आहेत.’
सचिन पिळगावकर पुढे म्हणाले, ”तू तू मैं मैं’ मालिकेचा सिक्वल साप्ताहिक आधारावर प्रसारित होणार आहे…’ मालिकेबद्दल अधिक माहिती कळू शकलेली नाही. ‘तू तू मैं मैं’ मालिकेच्या जुन्या भागात सुप्रिया यांच्याशिवाय रीमा लागू, महेश ठाकूर आणि कुलदीप पवार यांनी महत्त्वाची भूमिका निभावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.
मालिकेत महेश ठाकूर यांनी सुप्रिया पिळगावकर यांचे पती रवी गोपाळ वर्मा या भूमिकेला न्याय दिला होता. तर कुलदीप पवार हे गोपाळ वर्मा म्हणजे रीमा लागू यांच्या पतीच्या भूमिकेत चाहत्यांसमोर आले… आता ‘तू तू मैं मैं’ मालिका पुन्हा कधी छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार या प्रतीक्षेत चाहते आहेत…
