Aishwarya Rai : तुला ऐश्वर्याशी लग्न करायचंय… सलमान खानने रागात श्रीमंत उद्योजकाला सिगरेटने चटका दिला तेव्हा…
Aishwarya Rai - Salman Khan : ऐश्वर्याशी लग्न करण्याची श्रीमंत उद्योजकाची इच्छा, रागात सलमान खान याने दिला सिगरेटचा चटका, धक्कादायक होती ती वेळ... आजही सलमान आणि ऐश्वर्या खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत

Aishwarya Rai – Salman Khan : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान आज त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले असले तरी, त्यांच्या नात्यामुळे कायम चर्चेत असतात. दोघांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला… पण एक काळ असा होता जेव्हा सलमान – ऐश्वर्या चाहत्यांना फॅशन गोल्स देत होते. एकदा उद्योजक सबीर भाटिया याने ऐश्वर्या हिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा, सलमान खान याने मुद्दाम सबीर भाटिया याला सिगरेटने चटका दिला.
हॉटमेलचे सह-संस्थापक साबीर भाटिया याला एकदा ऐश्वर्या राय बच्चन हिचं कौतुक केल्याबद्दल मोठी किंमत मोजावी लागली होती, ज्यामुळे बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानशी त्याचा संघर्ष झालेला. या घटनेला दोन दशकांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. तेव्हा ऐश्वर्या राय आणि सबीर यांच्या प्रेमसंबंधांनी देखील जोर धरला होता. कारण एका कार्यक्रमात सबीर याने ऐश्वर्या हिच्यासोबत लग्न करण्याची देखील इच्छा व्यक्त केली होती.
रिपोर्टनुसार, सबीर याने ऐश्वर्या हिला घातलेली लग्नाची मागणी सलमान खान याला बिलकूल आवडलेली नव्हती. 2001 मध्ये झालेल्या एका पर्टीमध्ये सलमान खान आणि सबीर यांच्यामध्ये वाद झावा होता.. पार्टीमध्ये सलमान खान सबीर याच्याकडे आला आणि म्हणाला, ‘तू तोच पुरुष आहेस ना, ज्याने ऐश्वर्या हिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली..’ मात्री टीव्ही होस्ट सिनी गरेवाल हिच्या शोमध्ये या फक्त अफवा असल्याचं सांगण्यात आलं .
रिपोर्टमध्ये सांगितल्यांनुसार, सलमान, सबीर आणि महिलेच्यामध्ये आला आणि त्याने स्वतःच्या हातात असलेली सिगरेट सबीर याच्या हातावर झटकली.. यावर विनोदी अंदाजात सलमान, सबीर याला म्हणाला, ‘अखेर तुझ्या हातावर राख लागलीच…’
सलमान खान आणि ऐश्वर्या राय
एक काळ असा होता जेव्हा सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. पण दोघांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला. 2002 मध्ये सलमान – ऐश्वर्या एकमेकांपासून विभक्त झाले. पुढे ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं आणि 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. पण सलमान खान याने कधीच लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. आजही अभिनेता एकटाच आयुष्य जगत आहे.
