सलमान खानचा बॉडीगार्ड शेरावर ओढावली दु:खद वेळ, घडली ‘ही’ वाईट घटना
सलमान खानसोबत सावलीसारखा असणार त्याचा बॉडीगार्ड शेराबाबत एक दु:खद घटना घडली आहे. त्याने एका पोस्टद्वारे याची माहितीही दिली आहे. नक्की काय घडलंय त्याच्या आयुष्यात जाणून घेऊयात,

सलमान खानचे तसे अनेक जवळचे मित्रमंडळी आहेत. ज्यांना त्याच्या आयुष्याबद्दल सर्वकाही माहित आहे. पण त्याचा एक मित्र जो त्याच्यासोबत कायनम सावलीसारखा असतो. आणि कदाचित सलमानबद्दल त्याच्याइतकं कोणाला काही माहित असेल. तो मित्र म्हणजे जो शेराचा बॉडीगार्डही आहे शेरा. शेरावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेराचे वडील आता या जगात नाहीयेत. त्यांचे वडील श्री. सुंदर सिंग जॉली यांचे वयाच्या 88 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. सुंदर सिंग यांचे अंत्यसंस्कार मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा स्मशानभूमीत करण्यात आले.
ते अनेक वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते.
सलमान खानचा बॉडीगार्ड शेराचे वडील सुंदर लाल जॉली गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंजत होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते.त्यामुळे अखेर आज त्यांचं या गंभीर आजाराने निधन झालं.
View this post on Instagram
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
एका वृत्तानुसार, शेराने त्यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे आणि सांगितले आहे की त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या ओशिवरा, अंधेरी येथील निवासस्थानापासून दुपारी 4 वाजता होणार होती. एका अधिकृत निवेदनात शेराने म्हटलं होतं की, ‘माझे वडील श्री सुंदर सिंग जॉली आज आपल्याला सोडून स्वर्गात गेले आहेत. त्यांचा शेवटचा प्रवास दुपारी 4 वाजता माझ्या निवासस्थान 1902, द पार्क लक्झरी रेसिडेन्सेस, लोखंडवाला बॅक रोडजवळ, ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई येथून सुरू .’
शेराने त्याच्या वडिलांचा शेवटचा वाढदिवस साजरा केला
या वर्षाच्या सुरुवातीलाच शेराने त्याच्या वडिलांचा वाढदिवसही साजरा केला होता. त्याच्या 88 व्या वाढदिवसानिमित्त शेराने एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले ‘माझ्या देवाला, माझ्या वडिलांना, माझ्या प्रेरणास्थानाला, सर्वात बलवान व्यक्तीला 88 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! माझ्याकडे जे काही बळ आहे ते तुमच्याकडून येतं. मी नेहमीच तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि नेहमी करेल!’ आणि आता नक्कीच या दु:खद घटनेमुळे त्याला स्वत:ला किती सावरावं लागेल याचा अंदाज आपण लावू शकतो. तसेच यावेळी सलमान खानही नक्कीच त्याच्यासोबत असेल यात शंका नाही.
