मुन्नीनंतर आता 'मुन्ना बदनाम हुआ', 'दबंग 3'चं चौथं गाणं रिलीज

बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खानचा 'दबंग 3' (Dabangg 3) हा सिनेमा लवकरच येणार आहे. सध्या या सिनेमाचं नवं गाणं 'मुन्ना बदनाम हुआ' (Munna Badnaam Hua) रिलीज करण्यात आलं.

मुन्नीनंतर आता 'मुन्ना बदनाम हुआ', 'दबंग 3'चं चौथं गाणं रिलीज

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खानचा ‘दबंग 3’ (Dabangg 3) हा सिनेमा लवकरच येणार आहे. सध्या या सिनेमाचं नवं गाणं ‘मुन्ना बदनाम हुआ’ (Munna Badnaam Hua) रिलीज करण्यात आलं. हे गाणं ‘दबंग’च्या ‘मुन्नी बदनाम हुई’ याच गाण्याच्या चालीवर तयार करण्यात आलं आहे (Dabangg 3 new song). यामध्ये काही बदलही करण्यात आले आहेत, मात्र गाण्याची चाल तीच ठेवण्यात आली आहे.

हे नवं गाणं 4 मिनटे 6 सेकंदांच आहे. या गाण्यालाही ‘दबंग-3’च्या इतर गाण्यांप्रमाणे ऑडियो फॉरमॅटमध्ये रिलीज करण्यात आलं. या गाण्याचा व्हिडीओ अद्याप रिलीज करण्यात आलेला नाही. हे गाणं गायिका ममता शर्मा, गायक कमाल खान आणि बादशाह ने म्हटलं आहे. हे गाणं दानिश शबरीने लिहिलं आहे. तर गाण्याला साजिद-वाजिदने संगीत दिलं आहे. तसेच, यामध्ये रॅपर बादशाहचा तडकाही चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.

2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दबंग’मधील आइटम नंबर ‘मुन्नी बदनाम हुई’मध्येही ममता शर्मा यांचा आवाज होता. त्यानंतर आता ‘दबंग 3’च्या गाण्यालाही त्यांनीच म्हटलं आहे. 2010 मध्ये ‘मुन्नी बदनाम हुई’ खूप लोकप्रिय झालं होतं आणि जवळपास 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा हेच गाणं नव्या रुपात आलं आहे. ‘मुन्नी बदनाम हुई’ प्रमाणे ‘मुन्ना बदनाम हुआ’ हे गाणंही हिट ठरण्याची शक्यता आहे.

गाण्याचा व्हिडीओ कधी येणार?

हे गाणं प्रदर्शित होताच युट्युबवर काही तासातच लाखो लोकांनी हे ऐकलं आहे. त्यामुळे आता या गाण्याचा व्हिडीओ कसा असेल याबाबत सलमानच्या चाहत्यांमध्ये कमालिची उत्सुकता आहे. हे गाणं सलमानच्या चाहत्यांसाठी नक्कीच सरप्राईज ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *