बिग बॉस होस्ट करण्यासाठी सलमाननं किती पैसे घेतले असतील? एका बाजूला सलमान, दुसऱ्या बाजूला 350 लँड रोव्हर

येणाऱ्या बिग बॉसच्या एडीशनसाठी सलमानने जी रक्कम घेतलीय, त्यात 1 कोटी रुपये किंमतीच्या लँड रोव्हर्सच्या अलिशान अशा कमीत कमी 350 गाड्या तो सहज घेऊ शकतो. म्हणजेच 15 सिजनसाठी सलमान खाननं 350 कोटी फी चार्ज केल्याचं वृत्त आहे

बिग बॉस होस्ट करण्यासाठी सलमाननं किती पैसे घेतले असतील? एका बाजूला सलमान, दुसऱ्या बाजूला 350 लँड रोव्हर
Salman Khan
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 7:27 AM

मुंंबई : खानांचा बॉलीवुडमध्ये दबदबा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. फक्त दर काही दिवसानंतर त्याचा पुरावा तेवढा समोर येतो. आता हेच बघा, सलमान खाननं बिग बॉस होस्ट करण्यासाठी जे पैसे घेतल्याचं वृत्त आहे. त्यानं सर्वसामान्यांचं डोकं चक्रावून जाईल. गेल्या 15 वर्षापासून सलमान खान बिग बॉस होस्ट करतो आणि त्यासाठी तो तगडी फीसही वसूल करतो. त्याची चर्चाही होते. पण येणाऱ्या बिग बॉसच्या एडीशनसाठी त्यानं जी रक्कम घेतलीय. त्यात 1 कोटी रुपये किंमतीच्या लँड रोव्हर्सच्या अलिशान अशा कमीत कमी 350 गाड्या तो सहज घेऊ शकतो. म्हणजेच 15 सिजनसाठी सलमान खाननं 350 कोटी फी चार्ज केल्याचं वृत्त आहे.

350 कोटी रुपयांचा बिग बॉस?

बिग बॉस 15 ची सुरुवात ऑक्टोबरमध्ये होईल. यावेळेस जंगलाची थीम असल्याचं कळतंय. एकूण 14 आठवडे हा शो चालणार आहे. सलमान खानला शो होस्ट करण्यासाठी 350 कोटी रुपये मिळतील. म्हणजेच प्रत्येक आठवड्यासाठी 25 कोटी रुपये. बिग बॉस 13 साठी सलमान खानला प्रत्येक आठवड्यासाठी 13 कोटी रुपये मिळाले होते. प्रत्येक एपिसोडसाठी अडीच कोटी मिळाले. नंतर 13 व्या सिजनमध्येच त्याची फी डबल करण्यात आली. म्हणजेच 5 कोटी.

कसा असेल बिग बॉस 15?

बिग बॉसचा शो ऑक्टोबरमध्ये सुरु होईल. त्यात कोण असतील याची चर्चा आता सुरु झालीय. पण अधिकृत अशी अजून लिस्ट जाहीर करण्यात आलेली नाही. सुशांत आत्महत्येमुळे चर्चेत असलेली रिया चक्रवर्तीपासून ते तारक मेहता का उल्टा चष्मावाल्या निधी भानूशालीपर्यंत अनेकांचं नाव पार्टीसिपन्ट म्हणून चर्चेत आहे. बिग बॉसचा पंधरावा सिजनमध्येही नेहमीप्रमाणं अनेक ट्विस्ट असतील, भांडणं असतील, खोटी खरी अफेअर पहायला मिळतील, प्रसंगी शिवीगाळही ऐकायला मिळेल, कारण आतापर्यंतच्या सिजनमध्ये हाच शोचा आत्मा राहीलाय. येणाऱ्या सिजनमध्येही वाईल्ड कार्ड एन्ट्रीज असतील आणि इतर अनेक ट्विस्ट. पण सध्या तरी सलमाननं घेतलेली फी वाचून, आपण तेवढ्या पैशात काय काय करु याचाच हिशेब केलेला बरा…

हे ही वाचा :

क्रिकेट असो की राजकारण… ‘कॅप्टन’विरोधात सिद्धूंचं कायम बंड; सेकंड इनिंगमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग ‘क्लीन बोल्ड’

TMC मध्ये आल्याने बाबुल सुप्रियोंवर ममता बनर्जी खुश, पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.