AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

72 वर्षीय अभिनेत्याला अत्यंत अपमानास्पद वागणूक, निघून गेले गुपचूप..; नेटकऱ्यांचा राग अनावर

सोशल मीडियावर सध्या 'गिन्नी वेड्स सनी 2' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 72 वर्षीय अभिनेते सुधीर पांडे यांना दिलेली अपमानास्पद वागणूक पाहून चाहते भडकले आहेत.

72 वर्षीय अभिनेत्याला अत्यंत अपमानास्पद वागणूक, निघून गेले गुपचूप..; नेटकऱ्यांचा राग अनावर
Sudhir PandeyImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 19, 2026 | 5:14 PM
Share

अभिनेता अविनाश तिवारी आणि मेधा शंकर यांच्या आगामी ‘गिन्नी वेड्स सनी 2’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अविनाश आणि मेधा यांच्याशिवाय ज्येष्ठ अभिनेते सुधीर पांडे आणि इतर कलाकारसुद्धा उपस्थित होते. परंतु या कार्यक्रमात सुधीर पांडे यांना दिलेली अपमानास्पद वागणूक पाहून नेटकरी प्रचंड भडकले आहेत. या चित्रपटातील इतर कलाकारांवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ट्रेलर लाँचचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टेजवर एकीकडे अविनाश तिवारी, मेधा शंकर आणि इतर कलाकार उभे असतात, तिथेच एका बाजूला सुधीर पांडे उभे असतात. परंतु त्यांना कोणीच विचारत नाही. अखेर 72 वर्षीय सुधीर पांडे हे नंतर गुपचूप स्टेजवरून खाली उतरून निघून जातात. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘गिन्नी वेड्स सनी 2’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चमधील हा व्हिडिओ एक्स, इंस्टाग्राम आणि रेडिट यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान शेअर केला जातोय. या व्हिडिओवर नेटकरी राग व्यक्त करत आहेत. अनेकांनी चित्रपटाच्या टीमला सुनावलं आहे. सुधीर पांडे यांच्यासारख्या दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेत्याला महत्व न दिल्याने अनेकांनी निर्मात्यांवर टीका केली आहे.

पहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की स्टेजवर अविनाश माइकवर काहीतरी बोलतोय आणि त्याच्यासोबत मेधा उभी आहे. त्यांच्याच मागे सुधीर पांडेसुद्धा उभे आहेत. परंतु जेव्हा त्यांना कोणीच काही विचारत नसल्याचं लक्षात येतं, तेव्हा ते चुपचाप स्टेजवरून निघून जातात. स्टेजवरून उतरतानाही ते पुन्हा मागे वळून पाहतात की कदाचित कोणी आवाज देईल, पण कोणाचंच त्यांच्याकडे लक्ष नसतं. ‘हल्लीची पिढी अशीच आहे, ज्येष्ठ कलाकारांविषयी आदरच नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘उत्तम कलाकारांना अशी वागणूक दिली जात असल्याचं पाहून खूप वाईट वाटतं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.

हाच बॉलिवूडचा खरा चेहरा आहे, अशा शब्दातही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. सुधीर पांडे हे टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधील दिग्गज कलाकार आहेत. ते गेल्या अनेक दशकांपासून इंडस्ट्रीत काम करत आहत. त्यांनी शाहरुख खानपासून अक्षय कुमारपर्यंत अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केला आहे. ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘बालिका वधू’, ‘ससुराल गेंदा फूल’, ‘बेलन वाली बहू’, ‘जिंदगी मेरे घर आना’ यांसारख्या चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं