Nayanthara Wedding: दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराच्या लग्नाला ‘किंग खान’ची हजेरी; पहा Photo

शाहरुखचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'जवान' या चित्रपटात शाहरुख आणि नयनतारा एकत्र काम करणार आहेत. नयनताराच्या लग्नातील शाहरुखचा हा खास लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Nayanthara Wedding: दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराच्या लग्नाला 'किंग खान'ची हजेरी; पहा Photo
Shah Rukh Khan and NayantharaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 10:35 AM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) नुकतीच विवाहबंधनात अडकली. दिग्दर्शक विग्नेश शिवन (Vignesh Shivan) आणि नयनतारा यांनी चेन्नईतल्या महाबलीपुरम इथं कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. गेल्या सात वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. या लग्नसोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जात होतं. विशेष म्हणजे बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानसुद्धा (Shah Rukh Khan) या लग्नाला हजर राहिला आहे. शाहरुखचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख आणि नयनतारा एकत्र काम करणार आहेत. नयनताराच्या लग्नातील शाहरुखचा हा खास लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

गुरुवारी दुपारपर्यंत नयनतारा आणि विग्नेशच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले जातील. अभिनेते रजनीकांत यांनीसुद्धा या लग्नाला हजेरी लावली आहे. महाबलीपुरम इथल्या शेरॅटॉन पार्कमध्ये नयनतारा आणि विग्नेशच्या लग्नासाठी काचेचा मंडप उभारल्याचं कळतंय. ‘जेड बाय मोनिका’ या प्रसिद्ध फॅशन डिझायनरने डिझाइन केलेले पोशाख या दोघांनी परिधान केले आहेत. लग्नातील नयनताराचा लूक कसा असेल, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

विशेष म्हणजे दिग्दर्शक गौतम मेनन या लग्नसोहळ्याचं दिग्दर्शन एखाद्या चित्रपटाप्रमाणेच करणार आहेत. कारण नयनतारा आणि विग्नेशच्या लग्नाच्या व्हिडीओचे हक्क ओटीटी प्लॅटफॉर्मला विकले जाणार आहेत. एका ओटीटी प्लॅटफॉर्मने यासाठी त्यांना मोठी रक्कम दिली असून त्यासाठीच गौतम मेनन हे लग्नसोहळ्याचं रितसर दिग्दर्शन करणार असल्याचं समजतंय.

मार्च 2021 मध्ये नयनतारा आणि विग्नेश यांनी साखरपुडा केला. हे दोघं 2015 पासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘नानुम राऊडी धान’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. नयनताराने 2003 मध्ये चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यापूर्वी ती मॉडेलिंग करायची. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींमध्ये नयनताराचं नाव आवर्जून घेतलं जातं.

Non Stop LIVE Update
पुण्यात अनेक घटना घडल्या पण पालकमंत्री कुठे? सुप्रिया सुळेंचा घणाघात
पुण्यात अनेक घटना घडल्या पण पालकमंत्री कुठे? सुप्रिया सुळेंचा घणाघात.
पुणे पेटत असताना सागर बंगल्यावरचे बॉस... देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल
पुणे पेटत असताना सागर बंगल्यावरचे बॉस... देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल.
डोंबिवली स्फोट प्रकरणी उद्योगमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण आदेश, म्हणाले...
डोंबिवली स्फोट प्रकरणी उद्योगमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण आदेश, म्हणाले....
कीर्तिकरांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाची भूमिका काय? शिरसाटांनी म्हटल..
कीर्तिकरांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाची भूमिका काय? शिरसाटांनी म्हटल...
पुणे अपघातावर सुप्रिया सुळेंच मौन, अग्रवालशी संबंध? भाजप नेत्याचा आरोप
पुणे अपघातावर सुप्रिया सुळेंच मौन, अग्रवालशी संबंध? भाजप नेत्याचा आरोप.
डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट; काचांचा खच अन परिसरात धुराचे मोठाे लोट
डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट; काचांचा खच अन परिसरात धुराचे मोठाे लोट.
चूक केली... पुणे कार अपघातप्रकरणी विशाल अग्रवालची पोलिसांसमोर कबुली
चूक केली... पुणे कार अपघातप्रकरणी विशाल अग्रवालची पोलिसांसमोर कबुली.
जेष्ठ म्हणून आदर पण गांधीवादाचा..., रोहित पवारांच हजारेंना प्रत्युत्तर
जेष्ठ म्हणून आदर पण गांधीवादाचा..., रोहित पवारांच हजारेंना प्रत्युत्तर.
पुणे अपघातावर वसंत मोरे म्हणाले, पुण्याच्या नेत्यांची कीव येते कारण...
पुणे अपघातावर वसंत मोरे म्हणाले, पुण्याच्या नेत्यांची कीव येते कारण....
काका कमळ फूल 3 नंबरचं बटण, एका मतासाठी 500 रूपये व्हिडीओ होतोय व्हायरल
काका कमळ फूल 3 नंबरचं बटण, एका मतासाठी 500 रूपये व्हिडीओ होतोय व्हायरल.