Shah Rukh Khan | काश्मीरबद्दल शाहरुख खान याचा मोठा खुलासा, थेट म्हणाला, मी कधीच…
शाहरुख खान हा पुन्हा एकदा बाॅलिवूडचा किंग ठरलाय. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट मोठे धमाके करताना दिसत आहेत. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच जवान हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने तगडी कमाई केलीये.

मुंबई : शाहरुख खान याचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये पुनरागमन केले. झिरो हा चित्रपट (Movie) फ्लाॅप गेल्यापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची वाट पाहताना दिसले. शाहरुख खान याने शेवटी यंदा पठाण चित्रपटाच्या माध्यमातून मोठा धमाका केला. शाहरुख खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले.
शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा चित्रपट ठरलाय. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादात सापडला. या चित्रपटावर सतत टीका केली गेली. मात्र, प्रत्यक्षात या टिकेचा फायदा चित्रपटाला झाला. पठाणनंतर आता जवान हा चित्रपट शाहरुख खान याचा जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय.
सध्या शाहरुख खान याचा कौन बनेगा करोडपतीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान काश्मीरबद्दल मोठा खुलासा करताना दिसतोय. शाहरुख खान म्हणाला की, मी अजून एकदाही काश्मीर येथे गेलो नाहीये. त्याचे कारणही खूप जास्त मोठे आहे.
View this post on Instagram
शाहरुख खान म्हणाला, माझ्या वडिलांची आई काश्मीरी होती. तिने मला म्हटले की, आयुष्यात हे तीन ठिकाणे नक्कीच तू बघ. त्यापैकी एक म्हणजे इस्तांबुल, इटली आणि काश्मीर. मात्र, काश्मीर माझ्याशिवाय नाही बघायचे. यानंतर तिचे काही दिवसांमध्येच निधन झाले. यामुळे मी कधीच काश्मीरला गेलो नाही. शाहरुख खान याचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जुना आहे.
काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान हा श्रीनगरच्या विमानतळावर स्पाॅट झाला. डंकी चित्रपटाच्या शूटिंगसाठी शाहरुख खान हा कश्मीर येथे गेला. शाहरुख खान याचा आता जवान चित्रपटानंतर लगेचच डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खान याच्या या चित्रपटाची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. आता शाहरुख खान याचा हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
