AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan | दुखापतीच्या वृत्तानंतर शाहरुख मुंबईत परतला; व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला मोठा प्रश्न

बॉलिवूड इंडस्ट्रीतील 31 वर्षांच्या करिअरमध्ये शाहरुखला याआधीही अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागला होता. 2017 मध्ये त्याच्यावर सर्जरी करण्यात आली होती. ‘रईस’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

Shah Rukh Khan | दुखापतीच्या वृत्तानंतर शाहरुख मुंबईत परतला; व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला मोठा प्रश्न
Image Credit source: Twitter
| Updated on: Jul 05, 2023 | 8:16 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानला शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याचं वृत्त कळताच चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. लॉस एंजिलिसमध्ये आगामी एका प्रोजेक्टसाठी शूटिंग सुरू असताना त्याच्या नाकाला दुखापत झाल्याची माहिती होती. नाकातून रक्तस्राव होऊ लागल्याने त्याला तातडीने तिथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि नाकावर सर्जरी झाल्याचं म्हटलं गेलं होतं. या चर्चांदरम्यान नुकतंच शाहरुखला मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. बुधवारी पहाटे शाहरुख मुंबईत परतला आणि यावेळी तो नेहमीप्रमाणे फिट अँड फाइन दिसत होता.

पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास पापाराझींनी शाहरुखला मुंबई विमानतळावर पाहिलं. यावेळी तो निळ्या रंगाचा स्वेटशर्ट, डेनिम आणि ब्लॅक कॅप अशा लूकमध्ये होता. सर्जरीनंतर शाहरुखच्या नाकावर बँडेज असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र विमानतळावर शाहरुखच्या नाकारवर कोणताच बँडेज दिसला नाही. यावेळी त्याच्यासोबत पत्नी गौरी खान आणि लहान मुलगा अबरामसुद्धा होता.

शाहरुखचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ‘सुदैवाने तो ठीक दिसतोय’, असं एकाने लिहिलं. तर ‘तो खरंच ठीक आहे का’, असा सवाल दुसऱ्याने केला. ‘दुखापतीचं वृत्त खोटं होत का’, असाही प्रश्न काहींना पडला. मंगळवारी शाहरुखच्या दुखापतीची बातमी व्हायरल होताच असंख्य चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली होती. मात्र यावर शाहरुख किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील 31 वर्षांच्या करिअरमध्ये शाहरुखला याआधीही अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागला होता. 2017 मध्ये त्याच्यावर सर्जरी करण्यात आली होती. ‘रईस’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पाडावी लागली. 2013 मध्येही ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या शूटिंगनंतर शाहरुखवर आठवी सर्जरी करण्यात आली होती. त्याआधी 2009 मध्येही त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती.

शाहरुखने नुकतेच इंडस्ट्रीत 31 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त त्याने ट्विटरवर ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. जवळपास चार वर्षांच्या ब्रेकनंतर त्याने ‘पठाण’ या चित्रपटातून कमबॅक केलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. त्याचा ‘जवान’ हा चित्रपट येत्या 7 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवान या चित्रपटात शाहरुखसोबतच नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहेत. याशिवाय ‘डंकी’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये तो तापसी पन्नूसोबत भूमिका साकारणार आहे.

महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.