मुलीच्या जन्मानंतर शाहिद कपूर याने मागितली सासऱ्यांची माफी, घाबरलेल्या अवस्थेत म्हणाला…
Shahid Kapoor | मुलीच्या जन्मानंतर शाहिद कपूर याच्यावर का आली सासऱ्यांची माफी मागण्याची वेळ? अभिनेत्याने घाबरलेल्या अवस्थेत सासऱ्यांना फोन केला आणि म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त शाहिद आणि अभिनेत्याच्या लेकीची चर्चा...

मुंबई | 26 फेब्रुवारी 2024 : अभिनेता शाहिद कपूर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहिद कपूर याने 2015 मध्ये मीरा राजपूत हिच्यासोबत लग्न केलं. कुटुंबियांच्या इच्छेने शाहिद आणि मीरा यांनी लग्न केलं. आज शाहिद – मीरा बॉलिवूडच्या बेस्ट कपलच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. लग्नाच्या एक वर्षानंतर मीरा हिने मुलगी मिशा हिला जन्म दिला. पण मुलीचा जन्म झाल्यानंतर शाहिद याने घाबरलेल्या अवस्थेत सासऱ्यांना फोन केला आणि त्यांची माफी मागितली.
एका मुलाखतीत शाहिद याने मुलीच्या जन्मानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल सांगितलं. अभिनेता म्हणाला, ‘मुलगी झाली मी खूप आनंदी होतो. पण तेव्हा मी घाबरलो होतो. घाबरलेल्या अवस्थेत मी सर्वात आधी सासऱ्यांना फोन केला आणि सर्वात आधी त्यांची माफी मागितली.’
सासऱ्यांना फोन केल्यानंतर अभिनेता म्हणाला, ‘मी सासऱ्यांना फोन केला आणि सर्वात आधी त्यांची माफी मागितली. म्हणालो बाबा लग्नाच्या वेळेस मी तुम्हाला थोडा जरी त्रास दिला असेल किंवा माझ्याकडून कोणती चूक झाली असेल तर मला माफ करा. मी पण आता एका मुलीचा बाप झालो आहे. एक दिवस माझी मुलगी देखील लग्न करून तिच्या नवऱ्याच्या घरी जाईल… ‘
पुढे अभिनेता म्हणाला, ‘खरं सागू तर, माझ्या डोळ्यांसमोर पुढचे 30 वर्ष आले होते. एका मुलीचा बाप असणं फार वेगळी आणि खास भावना आहे. मला आणि मीराला पहिली मुलगीच हवी होती. पूर्वी फार रागीट होतो. मला सतत राग यायचा. पण मिशाच्या जन्मानंतर पूर्ण परिस्थिती बदलली आहे.’ असं म्हणत अभिनेत्याने मुलगी झाल्यानंतर भावना व्यक्त केल्या…
शाहिद आणि मीरा यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. शाहिद कधीच मुलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नाहीत. शाहिद बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. पण स्वतःच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अभिनेता कायम कुटुंबासोबत वेळ व्यतीत करताना दिसतो.
मीरा कपूर हिची ओळख शाहिद कपूर याची पत्नी म्हणून आहे. पण मीरा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर मीरा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील मीराच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत असतात.
