शहनाजच्या त्या व्हिडीओला काही तासातच 16 लाखांहून अधिक व्ह्यूज, तुम्ही पाहिला तो व्हिडीओ?

मध्यतंरी सोशल मीडियावर फेमस झालेले वाक्य 'रसोड़े में कौन था?" हे तयार करणारे संगीत निर्माता यशराज मुखाते सोशल मीडियावर स्टार झाला.

शहनाजच्या त्या व्हिडीओला काही तासातच 16 लाखांहून अधिक व्ह्यूज, तुम्ही पाहिला तो व्हिडीओ?

मुंबई : मध्यतंरी सोशल मीडियावर फेमस झालेले वाक्य ‘रसोड़े में कौन था?” हे तयार करणारे संगीत निर्माता यशराज मुखाते सोशल मीडियावर स्टार झाला. आता त्याने चर्चेत असलेल्या शहनाज गिल यांच्या एका डायलॉगवर म्युझिक बनवले आहे. आतापर्यंत व्हिडीओला 16 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (Shahnaz’s video got over 16 lakh views in just a few hours)
व्हिडिओमध्ये शहनाज गिल दु: खी आहे आणि ती म्हणते की, हैं क्या करूं मैं मर जाऊं. शहनाज म्हणते तुम्हारी फीलिंग तुम्हारी. तुम्हारा कुत्ता टॉमी और हमारा कुत्ता कुत्ता (त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता) त्याच वेळी, विशाल आदित्य सिंह शहनाजला पाणी देत ​​आहे आणि शांत करीत आहे. यानंतर यशराजने त्यावर संगीत लावले आहे. शहनाजच्या या डायलॉगमुळे यशराजची संगीत भारी वाटत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate)

शहनाज बिग बॉस 13 मध्ये जेव्हाखूप दुःखी झाली होती आणि रडत होती त्यावेळी हे बोलली होती. शहनाजचा हा डायलॉग अगोदर पासूनच खूप फेमस आहे. .
संगीत निर्माता यशराज मुखातेने या अगोदर स्टार प्लसवरील सीरियल ‘साथ निभाना साथिया’ च्या डायलॉगवर एक मजेदार रॅप बनविला होता. तो व्हिडिओ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेता वरुण धवन, राजकुमार या कलाकारांनीही आवडला होता. या व्हिडिओनंतर तो एकाच रात्री स्टार बनला.

‘सिद-नाझ’ या जोडीचं दुसरं व्हिडीओ गाणं 25 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाले होते. या व्हिडीओ गाण्याचे नाव ‘शोना शोना’ असे आहे. सिध्दार्थ-शहनाजचे चाहते या गाण्याबद्दल खूप उत्सुक होते. आणि त्याची आतुरतेने वाट पाहत होते. या गाण्याची सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा होती. ट्विटर ट्रेंडवर हे गाणं टॉप 3 मध्ये आले होते.

हे गाणं टोनी कक्कर आणि नेहा कक्कड़ यांनी गायलं आहे.  शुक्ला यांनी या गाण्याचे पोस्टर आज (24 नोव्हेंबर) इंन्सटाग्रामवर पोस्ट केले होते. हे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘या गाण्यात शहनाज आणि सिद्धार्थची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.’ याआधीही सिद्धार्थने या गाण्याचे पोस्टर प्रसिद्ध केले होते.

संबंधित बातम्या :

Husnn Hai Suhana Song Out : ‘कुली नंबर 1’ चे आणखीन एक गाणे रिलीज वरुण आणि साराची जबरदस्त केमिस्ट्री!

वेब सीरीज AK vs AK अडकली वादात, भारतीय वायुसेनाने दिग्दर्शकांना पाठवले पत्र!

(Shahnaz’s video got over 16 lakh views in just a few hours)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI