आमिर-सलमान-शाहरुख एकाच सिनेमात झळकणार

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) चा सिनेमा 'लाल सिंह चड्ढा' पुढच्या वर्षी रुपेरी पडद्यावर येणार आहे (Lal Singh Chaddha). विशेष म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून अनेक सिनेरसिकांचं एक स्वप्न सत्यात उतरणार आहे.

आमिर-सलमान-शाहरुख एकाच सिनेमात झळकणार

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) चा सिनेमा ‘लाल सिंह चड्ढा’ पुढच्या वर्षी रुपेरी पडद्यावर येणार आहे (Lal Singh Chaddha). विशेष म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून अनेक सिनेरसिकांचं एक स्वप्न सत्यात उतरणार आहे. या सिनेमात बॉलिवूडचे तिनही कान सोबत झळकणार आहेत. आमिरच्या या सिनेमात अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत (Aamir-Salman-Shahrukh).

रिपोर्ट्सनुसार, आमिरने या सिनेमात शाहरुख खानसाठी एक स्पेशल रोल ठेवण्यात आला आहे. ही कुठला कॅमियो रोल नसून एक महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे, जी सिनेमासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल (Lal Singh Chaddha).

शाहरुख व्यतिरिक्त आमिर सलमान खानलाही या सिनेमात घेण्याच्या विचारात आहे. आमिर खानला त्याच्या या सिनेमात तिन्ही खान एकत्र दाखवण्याची इच्छा आहे, असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. सलमान खानसाठीही आमिरने एक महत्त्वाची भूमिका राखून ठेवली आहे. शाहरुखने त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमातील भूमिकेबाबत सांगितलं आहे, मात्र, अद्याप सलमान खानने या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यासाठी होकार दिलेला नाही.

या सिनेमाची काहाणी अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे. तर ‘सीक्रेट सुपरस्टार’सिनेमाचे दिग्दर्शक अद्वैत चंदन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. वायाकॉम 18 मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून या सिनेमाची निर्मिती केली जात आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा 2020 मध्ये ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *