नवे ‘रामयुग’ पाहून संतापले ‘शकुनी मामा’, ‘भगवान श्रीरामा’चा नवा अवतार पाहून गुफी पेंटल म्हणाले…

कोरोना काळात, जेव्हा देश लॉकडाऊनमध्ये होता, तेव्हा 80-90च्या मालिका पुन्हा एकदा टीव्हीवर प्रसारित केल्या गेल्या. हे पाहून प्रेक्षक खूप आनंदी झाले. ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘श्री कृष्ण’ पुन्हा एकदा पडद्यावर पाहून प्रेक्षक या मालिकांमध्ये मंत्रमुग्ध झाले.

नवे ‘रामयुग’ पाहून संतापले ‘शकुनी मामा’, 'भगवान श्रीरामा'चा नवा अवतार पाहून गुफी पेंटल म्हणाले...
गुफी पेंटल

मुंबई : कोरोना काळात, जेव्हा देश लॉकडाऊनमध्ये होता, तेव्हा 80-90च्या मालिका पुन्हा एकदा टीव्हीवर प्रसारित केल्या गेल्या. हे पाहून प्रेक्षक खूप आनंदी झाले. ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘श्री कृष्ण’ पुन्हा एकदा पडद्यावर पाहून प्रेक्षक या मालिकांमध्ये मंत्रमुग्ध झाले. या शोच्या री-एअरिव्हिंगने टीआरपी यादीमध्ये आपले खास स्थान बनवले आहे. लाखो लोकांनी पुन्हा एकदा रामायण पाहिले होते. यावर्षी लॉकडाऊनमध्ये ‘रामायण’ पुन्हा प्रसारित झाले नाही, मात्र चित्रपट निर्माते कुणाल कोहली (Kunal Kohli) याने ‘रामयुग’ ही वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीस आणली (Shakuni Fame Actor Gufi Paintal criticized kunal kohli new series Ramyug based on Ramayan).

एमएक्स प्लेअरवर 6 मे रोजी ‘रामयुग’ सीरीज प्रदर्शित केली आहे. या मालिकेत भगवान रामाची कहाणी एका वेगळ्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जे बर्‍याच लोकांना आवडले नाही. त्यापैकी एक म्हणजे गुफी पेंटल (Gufi Paintal) अर्थात महाभारतात ‘शकुनी मामा’ साकारणाऱ्या या अभिनेत्याने देखील आपला राग व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून, तसेच निर्मात्यांना फटकारत ‘रामयुग’विषयी आपली समीक्षा दिली आहे.

प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न

गुफी पेंटल यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओमध्ये ते म्हणतात की, ‘मी रामयुगची एक झलक पाहिली आहे. नवीनता आणण्याच्या उत्कटतेमध्ये निर्माते इतक्या दूर का जातात?, ही फार खेदाची बाब आहे. यामध्ये कलाकारांचा पोशाख बरोबर नाही, वातावरणही ठीक नाही किंवा त्यांचा गेटअपही चांगला नाही. मला वाटलं की, रामयुगात काहीतरी नवीन पाहता येईल आणि या पिढीला काहीतरी नवीन मिळेल.’

गुफी पेंटल पुढे म्हणाले की, ‘आपण नेहमीच भगवान राम, सीता माता, हनुमान आणि भगवान शिव यांची प्रतिमा अनेक ठिकाणी पाहिली आहे. तीच छवी आपल्या डोळ्यांसमोर येते. मात्र, निर्मात्यांनी हीच प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही ते इतके आधुनिक केले आहे की, भगवान रामाचा अवतार बाहुबलीसारखा दिसतो आहे.’(Shakuni Fame Actor Gufi Paintal criticized kunal kohli new series Ramyug based on Ramayan)

चित्रपट निर्मात्यांना फटकारले!

ते पुढे म्हणाले, ‘मला माहित आहे की या मालिकेसाठी बरीच रक्कम खर्च केली गेली आहे. मी देखील एक चित्रपट निर्माता आहे. कोट्यावधी रुपये खर्च करा परंतु, आधी थोडेसे संशोधन करा, लोकांच्या भावनांशी खेळू नका. यातील नायक आजच्या धाटणीचा आहे, साड्या आधुनिक आहेत, कपडे आधुनिक आहेत. हे पाहिल्यानंतर असे दिसते की हे लोक नाटक करत आहेत. समजा तुम्ही खूप पैसा गुंतवला आहे, जर तुम्हाला भारतीयांच्या मनापर्यंत पोहोचवायचे असेल, तर तुम्ही त्यांची वेशभूषा बदलू शकत नाही. शतकानुशतके हे आपल्या मनात हीच प्रतिमा आहे. ही गोष्ट योग्य नाही! यात ग्राफिक्स चांगले आहे. पण, त्यामध्ये अधिक श्रद्धा, कृपा आणि भक्ती असावी.’

कुणाल कोहलीला दिला सल्ला

यावेळी गुफी पेंटल यांनी जुन्या रामायणाची स्तुती केली आणि म्हणाले, ‘रामानंद सागर यांनी सर्वोत्कृष्ट रामायण तयार केले होते, म्हणूनच अरुण गोविलजी अजूनही भगवान रामाप्रमाणे पूजले जातात. दीपिका अजूनही सीता मानली जाते आणि सुनील लाहिरी यांना आजही ‘लक्ष्मण’ असे म्हटले जाते. या मालिकेत राम आणि रावण सारखेच दिसत आहेत. या दोघांमध्ये काहीही फरक नाही. भाषेचे देखील भान नाही, याच चक्क ‘छोकरे’ हा शब्द वापरला गेला आहे.’

‘आपली संस्कृती दहा हजार वर्ष जुनी आहे. आपले संस्कार कुठे गेले? कोहली सर खूप चांगले फिल्म मेकर आहेत. मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आपण आजच्या पिढीला हे असे रामायण सांगणार आहात का?. ग्राफिक्स वगळता यात काहीही दिसत नाही. कृपया, असे काहीही करण्यापूर्वी संशोधन करा.’, असे म्हणत त्यांनी कुणाल कोहलीला सल्ला देखील दिला.

(Shakuni Fame Actor Gufi Paintal criticized kunal kohli new series Ramyug based on Ramayan)

हेही वाचा :

PHOTO | ‘कही प्यार ना हो जाये’ फेम अभिनेत्री पूजा बत्राचा ‘बिकिनी’ योगा, नव्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

Photo: वयाच्या 43 व्या वर्षीही चाहत्यांवर भुरळ, शाहरुखची को-स्टार होती दीपशिखा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI