‘पैसे कमावण्यासाठी मी कोणत्याही…’, 6 कोटींची गुंतवणूक, शिल्पा शेट्टीला 573% फायदा, असं केलं तरी काय?
Shilpa Shetty: 'पैसे कमावण्यासाठी मी कोणत्याही...', 6 कोटींची गुंतवणूक करून शिल्पा शेट्टीला झालाय 573% इतका मोठा फायदा, अभिनेत्रीने कमी दिवसांत कशी कमावली कोट्यवधींची माया?

Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमे आणि रिऍलिटी शोमध्ये मुख्य भूमिका बजावत शिल्पाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. शिल्पा फक्त अभिनेत्रीच नाही तर एक यशस्वी उद्योजिका देखील आहे. एका कंपनीत 6 कोटी रुपयांची गुंतवणूक करत अभिनेत्रीने 573% प्रॉफिट म्हणजे 45 कोटी रुपये कमावले आहे. यावर खुद्द अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय ‘पैसे कमावण्यासाठी मी नैतिकतेशी तडजोड करत नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
शिल्पा शेट्टीने ज्या कंपनीमध्ये 6 कोटींची गुंतवणूक केली आहे, त्या कंपनीबद्दल सांगायचं झालं तर, त्या कंपनीचं नाव ‘मामाअर्थ’ अससं आहे. या कंपनीची किंमत आता बिलियन डॉलर आहे. आता ‘मामाअर्थ’ कंपनी युनिकॉर्न म्हणून देखील ओळखली जाते. गेल्या 8 वर्षात कंपनी यशस्वी झेप घेतली आहे.
View this post on Instagram
शिल्पा शेट्टी म्हणाली, ‘8 वर्षांपूर्वी कंपनीचे संस्थापक माझ्याकडे आले होते. कंपनीचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून त्यांना माझं मानधन परवडणारं नव्हतं. म्हणून मी व्यवसायात हिस्सेदारीची घट घातली आणि कंपनीच्या संस्थापकांनी ती अट मान्य केली…’
‘तेव्हा कंपनी जवळपास 35 कोटी रुपयांची असेल. कंपनीसोबत हात मिळवल्यामुळे मी श्रीमंत झाली आहे. आता ही कंपनी यूनिकॉर्न कंपनी आहे.’ सांगायचं झालं तर, मामाअर्थ कंपनी IPO मध्ये गेली तेव्हा शिल्पाने 2018 मध्ये कंपनीमध्ये 6.7 कोटी गुंतवले आणि 16 लाख शेअर अभिनेत्रीच्या नावावर झाले.
कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर अभिनेत्री म्हणते, ‘मी फक्त अशात कंपन्यांसोबत काम करते ज्यावर माझा विश्वास आहे. मी अशा कंपनींची जाहिरात करत नाही जे पान मसाला यांसारख्या वस्तूंची विक्री करतात. ज्यासाठी कंपनी पैसे देखील जास्त मोजते. मी पैशासाठी कोणत्याही उत्पादनांबरोबर काम करु शकत नाही. पैसे कमावण्यासाठी मी नैतिकतेशी तडजोड करत नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र शिल्पा शिट्टी हिची चर्चा रंगली आहे.
