AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जय-वीरू, बसंती, ठाकूर आणि गब्बर.. ‘शोले’साठी कोणाला किती मिळाली फी ?

कल्ट चित्रपटाचे स्थान मिळवलेल्या शोलमधील सगळ्याच भूमिका अजरामर होत्या. 49 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला शोले हा बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. आजही लोकांना हा चित्रपट खूप आवडतो.

जय-वीरू,  बसंती, ठाकूर आणि गब्बर.. 'शोले'साठी कोणाला किती मिळाली फी ?
| Updated on: Jun 20, 2024 | 11:37 AM
Share

चित्रपट असो किंवा जाहिरात , आजच्या काळात बॉलिवूडचे कलाकार हे प्रत्येक कामासाठी कोट्यवधी रुपयांची फी आकारतात. मात्र एककाळ असा होता, जेव्हा अभिनेते-अभिनेत्रींसाठी 1 लाख रुपयांचे मानधनही खूप होते. सहाय्यक भूमिकांमधील कलाकारांना तर 20-25 हजार रुपयेच मिळायचे. कल्ट चित्रपटाचे स्थान मिळवलेल्या शोलमधील सगळ्याच भूमिका अजरामर होत्या. 49 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला शोले हा बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. आजही लोकांना हा चित्रपट खूप आवडतो. या चित्रपटात जय-वीरूची जोडी सर्वोत्कृष्ट होती, तर बसंतीची स्टाइलही सर्वात अनोखी होती. गब्बर या खलनायकाला तर सगळेच घाबरायचे. मात्र या चित्रपटासाठी कलाकारांना किती मानधन मिळालंय तुम्हाला माहीत आहे का. त्यांची फी ऐकाल तर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही .

धर्मेंद्र यांना मिळालं सर्वाधिक मानधन

शोलेमध्ये धर्मेंद्र, मॅक मोहन, हेमा मालिनी, जया भादुरी, अमिताभ बच्चन, संजीव कुमार अमजद खान, असरानी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांना 1 लाख 50 हजार रुपये, अमिताभ बच्चन यांना 1 लाख रुपये, हेमा मालिनी यांना 75 हजार रुपये, जया भादुरी यांना 35 हजार रुपये, संजीव कुमार यांना 1 लाख 25 हजार रुपये, मिळाले होते. स्टार्सची ही फीस ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल. एखाद्या सेलिब्रिटीने एवढी कमी फी आकारल्याचे तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल.

तोडले अनेक रेकॉर्ड्स

शोलेचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले होते. या चित्रपटाचे बजेट 3 कोटी होते. 15 ऑगस्ट 1975 रोजी शोले चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट 25 आठवड्यांहून अधिक काळ थिएटरमध्ये चालला. 3 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 35 कोटींची कमाई केली होती. जर हा चित्रपट आजच्या काळात बनला असता तर त्यातील स्टारकास्टच्या फीसाठी बजेटच्या निम्म्याहून अधिक पैसे लागले असते. या चित्रपटाची स्टारकास्टच इतकी मोठी आहे की त्यांच्या फीसह बजेट 100 कोटी रुपये झाले असते.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.