AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

siima awards 2021 winners list : साऊथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्ड सोहळा संपन्न, कोण ठरलं पुरस्काराचं मानकरी? पाहा संपूर्ण यादी

साऊथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्ड 2020 वितरण सोहळा काल पार पडला. हैदराबादमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित होते.

siima awards 2021 winners list : साऊथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्ड सोहळा संपन्न, कोण ठरलं पुरस्काराचं मानकरी? पाहा संपूर्ण यादी
महेश बाबू रश्मिका मंदाना
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 10:41 AM
Share

हैदराबाद: भारतीय चित्रपचसृष्टीत दाक्षिणात्य सिनेमाचं महत्वाचं स्थान आहे. दक्षिणेकडील प्रमुख चार राज्यांतील मनोरंजन विश्वाला दाक्षिणात्य सिनेमा म्हणून पाहिलं जातं. तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांची मिळून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी बनली आहे. या चार भाषेत तयार होणाऱ्या चित्रपट क्षेत्राला दक्षिण भारतातील फिल्म इंडस्ट्री असंही म्हटलं जातं. साऊथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्ड 2020 वितरण सोहळा काल पार पडला. हैदराबादमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित होते. बेस्ट अ‌ॅक्ट्रेस म्हणून रश्मिका मंदाना तर बेस्ट अ‌ॅक्टर म्हणून महेश बाबूचा गौरव करण्यात आला.

पुरस्कार सोहळ्याला कोण कोण उपस्थित?

साऊथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्ड सोहळ्याला महेश बाबू, रश्मिका मंदाना, श्रुती हसन, सी.टी.चाको, कार्तिकेय गुम्माकोंडा, अर्जुन दास, नानी, अल्लारी नरेश यासह इतर प्रमुख कलाकार पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात चित्रपटामधील कलात्मक आणि तांत्रिक गुणवत्तेच्या आधार पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.

पुरस्कार सोहळ्यात कलाकारांचा जलवा

साऊथ इंडियन इंटरनॅशन मुव्ही अवॉर्ड सोहळ्यात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या फॅशनचा जलवा दिसून आला. तर, अभिनेत्यांचा ड्रेस सेन्सही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत होता.

साऊथ इंडिया इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्ड 2020 विजेत्यांची यादी

बेस्ट डायरेक्टर ( तामिळ) : वेट्रीमारन- असुरन बेस्ट अ‌ॅक्टर इन अ लीडिंग रोल क्रिटीक्स कन्नड: रक्षित शेट्टी- अवने श्रीमान नारायण बेस्ट डायरेक्टर ( कन्नड) : हरी कृष्णा, पोन कुमारन- यजमान बेस्ट अ‌ॅक्टर इन अ लीडिंग रोल क्रिटीक्स तेलुगु: नानी- गँग लीडर बेस्ट डायरेक्टर ( मल्याळम) : लिजो जोस पेल्लीसेरी- जलीकट्टू बेस्ट डायरेक्टर ( तेलुगु) : वाम्शी- महर्षी बेस्ट अ‌ॅक्टर इन अ कॉमेडी रोल कन्नड: साधू कोकिळा- यजमान बेस्ट अ‌ॅक्टर इन अ कॉमेडी रोल मल्याळम: बासिल जोसेफ- केट्टियोलानू एंटे मलाखा बेस्ट अ‌ॅक्टर इन अ कॉमेडी रोल तेलुगु: अजय घोष- राजू गारू गढी ३ बेस्ट अ‌ॅक्ट्रेस इन अ लीडिंग रोल कन्नड: रचिता राम- आयुष्यमानभव बेस्ट अ‌ॅक्टर इन अ निगेटिव्ह रोल कन्नड: साईकुमार पी – भाराते बेस्ट अ‌ॅक्टर इन अ निगेटिव्ह रोल तेलुगु: कार्तिकेय – गँग लीडर बेस्ट अ‌ॅक्टर इन अ निगेटिव्ह रोल मल्याळम: सी टी चाको-इश्क बेस्ट अ‌ॅक्टर इन अ निगेटिव्ह रोल तामिळ : अर्जुन दास -कैथी लाईफ टाईम अ‌ॅचिव्हमेंट : शीला एंटरटेनमेंट ऑफ द इयर तेलुगु : अनिल राविपुडी – एफ 2 एंटरटेनर ऑफ द इयर तेलुगु : नानी – जर्सी आणि गँग लीडर बेस्ट अ‌ॅक्टर इन सपोर्टिवर रोल मल्याळम: रोशन मॅथ्यू बेस्ट अ‌ॅक्टर इन सपोर्टिवर रोल तेलुगु: अल्लारी नरेश – महर्षी बेस्ट अ‌ॅक्टर पदार्पण तेलुगु : श्री सिम्हा- माथू वाडलारा बेस्ट अ‌ॅक्टर पदार्पण तामिळ : केन करुनास- असुरन बेस्ट अ‌ॅक्टर पदार्पण कन्नड : अभिषेक गौडा- अमर बेस्ट अ‌ॅक्ट्रेस पदार्पण तेलुगु : शिवथामिका राज शेखर-दोरासनी बेस्ट प्रोड्युसर पदार्पण तामिळ:व्ही स्टुडिओज – अदाई बेस्ट अ‌ॅक्ट्रेस पदार्पण मल्याळम : अना बेन-कुम्बालंगी नाईटस बेस्ट प्रोड्युसर पदार्पण तेलुगु: स्टुडिओज 99 -मल्लेशम बेस्ट प्रोड्युसर पदार्पण मल्याळम: स्क्युब फिल्म्स -ऊयारे बेस्ट प्रोड्युसर पदार्पण कन्नड: कोस्टल ब्रीज प्रोडक्शन्स बेस्ट म्युझिक डायरेक्टर तामिळ: डी. इमाम- विस्वासम बेस्ट म्युझिक डायरेक्टर तेलुगु: डीएसपी- महर्षी बेस्ट म्युझिक डायरेक्टर कन्नड: वी हरिकृष्णा- यजमान बेस्ट कोरिओग्राफर कन्नड: इमरान सरधारिया- अवने श्रीमन्नारायण बेस्ट प्ले बॅक सिंगर मेल तेलुगु : अनुराग कुलकर्णी- इस्मार्ट शंकर टायटल ट्रॅक बेस्ट अ‌ॅक्टर लीडिंग रोल तेलुगु: महेश बाबू -महर्षी बेस्ट प्ले बॅक सिंगर मेल मल्याळम : हरिशंकर के एस- पविझा माझा बेस्ट प्ले बॅक सिंगर फिमेल तामिळ : सैधवी प्रकाश- इल्लू वाया पोकालाये बेस्ट प्ले बॅक सिंगर फिमेल मल्याळम :प्रार्थना – थारापाधामाके बेस्ट प्ले बॅक सिंगर फिमेल कनन्ड : अन्यना भट्ट – हेलादे केलादे बेस्ट लिरीक्स रायटर तेलुगु: श्री मनी- इदे काढा – महर्षी बेस्ट लिरीक्स रायटर तामिळ: विवेक- सिंगापेन्नेये बेस्ट लिरीक्स रायटर मल्याळम: विनायक ससीकुमार – अराधिके बेस्ट सिनेमेटॉग्राफर तामिळ : वेलराज – असुरन बेस्ट लिरीक्स रायटर कन्नड: पवन वाडेयार- नटसर्वभोमा बेस्ट अ‌ॅक्टर लीडिंग रोल कन्नड: दर्शन- यजमान बेस्ट अ‌ॅक्ट्रेस इन अ लीडिंग रोल क्रिटीक्स तेलुगु: रश्मिका मंदाना- डीअर कॉम्रेड बेस्ट फिल्म मल्याळम : आशिर्वाद सिनेमाज- लुसिफायर बेस्ट फिल्म तेलुगु : सितारा एटरटेंनमेटंस – जर्सी

इतर बातम्या:

Bigg Boss Marathi | कुणी बनलंय युट्युबर तर, कुणी करतंय प्रेक्षकांचं मनोरंजन! पाहा ‘बिग बॉस मराठी’चे स्पर्धक सध्या काय करतात…

बिग बॉस होस्ट करण्यासाठी सलमाननं किती पैसे घेतले असतील? एका बाजूला सलमान, दुसऱ्या बाजूला 350 लँड रोव्हर

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.