Sonu Nigam | ‘माझ्या मुलाने गायक होऊ नये आणि झाल्यास भारतात काम करू नये’, सोनू निगमचे वादग्रस्त वक्तव्य!

गाण्याच्या प्रमोशन दरम्यान सोनू निगमने एका वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्याच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Sonu Nigam | ‘माझ्या मुलाने गायक होऊ नये आणि झाल्यास भारतात काम करू नये’, सोनू निगमचे वादग्रस्त वक्तव्य!
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 1:17 PM

मुंबई : बॉलिवूडचा सुप्रसिध्द गायक सोनू निगम अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो (Sonu Nigam Controversial Statement). काही दिवसांपूर्वी त्याचे ‘ईश्वर का सच्चा बंदा’  हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याच्या प्रमोशन दरम्यान सोनू निगमने एका वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्याच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या मुलाने गायक होऊ नये आणि झाल्यास भारतात काम करू नये, असे सोनू निगम म्हणाला आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे भारतीय चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे (Singer Sonu Nigam’s Controversial statement over Son Nevaan’s Career).

सोनू निगमचा मुलगा निवान भारतात राहत नसून, तो दुबईत वास्तव्यास आहे. त्याच्या करिअर विषयी सोनू म्हणाला, “माझ्या मुलाला मी गायक करणार नाही. किमान भारतात तरी त्याने काम करु नये, अशी माझी इच्छा आहे.” सोनू निगमच्या या अजब वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

(Singer Sonu Nigam’s Controversial statement over Son Nevaan’s Career)

निवानला गायनाची आवड

एका प्रसिद्ध इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सोनू निगमने आपल्या मुलाच्या करिअरबाबतच्या निर्णयाचा खुलासा केला. निवान विषयी सांगताना सोनू म्हणतो, ‘खरे सांगायचे तर त्याने व्यवसायिक गायक होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. आणि व्हायचेच असेल तर, त्याने भारतात काम करु नये असे मला वाटते.’

‘तो भारतात राहात नाही. तो सध्या दुबईमध्ये आहे. त्याने तिथेच करिअर करावे असे वाटते. त्याला गाण्याची आवड आहे. तो देखील खूप छान गातो. पण, त्याला गाण्यापेक्षा अधिक गेमिंगची आवड आहे. दुबईतल्या टॉप गेमर्समध्ये त्याची गणना होते. मला वाटते त्याने आपले करिअर निवडले आहे. पण त्याने काय करावे आणि काय करु नये ही मते मी त्याच्यावर लादू शकत नाही’, असे सोनू निगम म्हणाला (Singer Sonu Nigam’s Controversial statement over Son Nevaan’s Career).

सोनू निगमचा मुलगा निवान सध्या दुबईत राहत असून, तिथल्या टॉप गेमर्समध्ये त्याची मोठे नाव आहे. मात्र, सोनू निगमच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याचे भारतीय चाहते कमालीचे नाराज झाले आहेत. अद्याप सोनू निगमने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

(Singer Sonu Nigam’s Controversial statement over Son Nevaan’s Career)

सोनूसोबत लेकाची गायकी

सोनू आणि त्याच्या मुलाला अनेकदा स्टेज परफॉर्मन्स करताना चाहत्यांनी पाहिले आहे. तसेच सोनूचा मुलगा निवान हा लहान असताना अनेकदा तो वडीलांसोबत रेकॉर्डींग स्टुडिओत रेकोर्डिंगसाठी जायचा. एवढेच नाही तर, लॉकडाऊनच्या काळात सोनूसोबत त्याच्या मुलानेही ऑनलाईन कॉन्सर्टमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, आता सोनूच्या वक्तव्यानंतर पुन्हा या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळेल की नाही, या विचाराने चाहते नाराज झाले आहेत.

(Singer Sonu Nigam’s Controversial statement over Son Nevaan’s Career)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.