Breaking News | मिर्झापूरचे दिग्दर्शक आणि OTT विरोधात सुप्रीम कोर्टाने काढली नोटीस, पाहा काय कारण!

अभिनेते पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू शर्मा यांच्या अभिनयाचा ‘भौकाल’ असणारी वेब सीरीज ‘मिर्झापूर’ (Mirzapur)  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:21 PM, 21 Jan 2021
Breaking News | मिर्झापूरचे दिग्दर्शक आणि OTT विरोधात सुप्रीम कोर्टाने काढली नोटीस, पाहा काय कारण!

मुंबई : अभिनेते पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू शर्मा यांच्या अभिनयाचा ‘भौकाल’ असणारी वेब सीरीज ‘मिर्झापूर’ (Mirzapur)  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या वेब सीरीजचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पहिल्या पर्वाप्रमाणेच ‘मिर्झापूर 2’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. मात्र, ‘मिर्झापूर 2’ प्रदर्शित झाल्यापासून त्याच्या मागे वादांचे शुक्लकाष्ट लागले आहे. हा वाद इतका वाढला होता की, तो थेट कोर्टात पोहोचला होता. आज सुप्रीम कोर्टाने जनहित याचिकेवर सुनावणी केली. (Supreme Court issues notice to Mirzapur web series director and OTT platform)

ज्यानंतर सुप्रीम कोर्टाने वेब सीरीजचे डायरेक्टर, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि केंद्र सरकारच्या विरोधात नोटीस बजावली आहे. लखनऊ कोर्टात ‘मिर्जापूर 2’ वेब सीरीजच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेद्वारे ‘मिर्झापूर 2’च्या निर्मात्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. या वेब सीरीजमधून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांची प्रतिमा डागाळली गेली आहे, असे या याचिकेत म्हणण्यात आले होते. या मालिकेत भोजपूर भाषिक प्रदेश गुन्हेगारीमध्ये सहभागी असल्याचे दाखवण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांनी 25 ऑक्टोबरला ‘मिर्झापूर 2’वर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांनी ट्विटद्वारे ही मागणी केली होती. पटेल यांनी ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनादेखील टॅग केले होते. या ट्विटमध्ये ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमधून ‘मिर्झापूर’ची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मिर्झापूरच्या खासदार या नात्याने मला हे मान्य नसल्याचे म्हणत त्यांनी ट्विटरद्वारे थेट पंतप्रधान मोदींना साकडे घातले होते.

संबंधित बातम्या : 

भारतातल्या लॉकडाऊनवर येतोय चित्रपट, पाहिलं पोस्टर रिलीज!

संकटाला धावून येणाऱ्या सोनू सूदच्या नावाने ॲम्बुलन्स सेवा सुरु, अशा प्रकारे करणार लोकांची मदत

‘तांडव’ वेब सीरीजचा वाद कधी थांबणार? वाचा आतापर्यंत काय घडलं…

(Supreme Court issues notice to Mirzapur web series director and OTT platform)