Sushant Singh Rajput Case | ड्रग्स प्रकरणात NCBकडून तस्कर हरीश खानला अटक, एमडीएमए ड्रग्ज जप्त

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 02, 2021 | 1:10 PM

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput) ड्रग्स प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) दोन ड्रग पेडलर्सना अटक केली आहे. त्यातील एकाचे नाव हरीश खान (Harish Khan) असे सांगितले जात आहे.

Sushant Singh Rajput Case | ड्रग्स प्रकरणात NCBकडून तस्कर हरीश खानला अटक, एमडीएमए ड्रग्ज जप्त
सुशांत सिंह राजपूत
Follow us

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput) ड्रग्स प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) दोन ड्रग पेडलर्सना अटक केली आहे. त्यातील एकाचे नाव हरीश खान (Harish Khan) असे सांगितले जात आहे. अटकेच्या वेळी हरीश खान याच्याकडून मोठ्या प्रमाणात एमडीएमए ड्रग्स (MDMA) जप्त करण्यात आले आहे. एनसीबी या प्रकरणी सातत्याने कारवाई करत आहे आणि येत्या काही दिवसांत आणखी काही महत्त्वपूर्ण अटका देखील होऊ शकतात (Sushant Singh Rajput drug Case NCB arrest Drugs Peddler Harish khan with MDMA drugs).

काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंह राजपूतचा रूममेट असलेला त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाणी यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आता त्याला चार जूनपर्यंत एनसीबीच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी 14 जून रोजी मुंबईत वांद्रे येथील घरात सुशांत मृत अवस्थेत सापडला होता. तेव्हा सिद्धार्थ पिठाणी, सुशांत सिंह राजपूतचा रूममेट होता. सिद्धार्थ पिठाणीने सर्वात आधी सुशांतला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत पाहिले होते. सिद्धार्थनेच इतर लोकांच्या मदतीने पंख्यावरून मृतदेह खाली उतरवला होता. सिद्धार्थनेच प्रथम पोलिसांना सुशांतच्या मृत्यूची माहिती दिली होती. सिद्धार्थ पिठणी असा पहिला व्यक्ती होता, ज्याने रुग्णवाहिका बोलवली आणि सुशांतचा मृतदेह रुग्णालयात पाठवला.

नवीन खुलासे होण्याची शक्यता

सिद्धार्थला गेल्या वर्षी ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती, परंतु त्यानंतर त्याला जामीन मिळाला. मात्र, काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा सिद्धार्थ पिठाणी याला अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणात काही नवीन खुलासे होण्याची शक्यता वाढली आहे.  पुन्हा एकदा सिद्धार्थ पिठाणीच्या माध्यमातून काही नवीन खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे (Sushant Singh Rajput drug Case NCB arrest Drugs Peddler Harish khan with MDMA drugs).

ड्रग्स प्रकरणात मोठी नावे आली समोर

ड्रग्स प्रकरणाच्या तपासणीदरम्यान बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलेब्सची नावे समोर आली होती. इतकेच नाही तर अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रुकल प्रीत सिंह यांच्याही एनसीबीने चौकशी केली होती. मात्र, या अभिनेत्रींविरूद्ध काहीच पुरावे न मिळाल्यानंतर एजन्सीने त्यांना क्लीन चिट दिली आहे. त्याच वेळी ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांना अटक करण्यात आली होती. मात्र, काही महिन्यांनंतर अभिनेत्रीला जामीन मिळाला.

मित्र गणेश याची सीबीआय कार्यालयाबाहेर निषेध करण्याची धमकी

सिद्धार्थच्या अटकेनंतर सुशांतचा मित्र गणेश म्हणाला की, त्याच्या अटकेमुळे हे प्रकरण केवळ ड्रग्सच्या अँगलमध्ये अडकवले जाईल. सिद्धार्थ सुशांतचा फ्लॅटमेट होता, म्हणून सीबीआयने देखील त्याच्यावर कारवाई करावी. सीबीआयनेही देखील त्याची लवकरात लवकर चौकशी केली पाहिजे, असे गणेश म्हणाला. तो पुढे म्हणाला की, 14 जूनपर्यंत सीबीआयकडून प्रतिसाद न मिळाल्यास ते दिल्लीस्थित सीबीआय कार्यालयाबाहेर निषेध नोंदवण्यास सुरुवात करेल.

(Sushant Singh Rajput drug Case NCB arrest Drugs Peddler Harish khan with MDMA drugs)

हेही वाचा :

अरुणिताला जिंकवून भेदभाव? Indian Idol 12च्या मेकर्सवर संतापले पवनदीपचे चाहते, म्हणाले…

श्रीदेवीने निधनापूर्वी लेकीला दिला खास सल्ला, आईच्या आठवणी सांगताना जान्हवी कपूर म्हणते…

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI