Sushant Singh Rajput: ‘… म्हणून मी सुशांतला ब्लॉक केलं’, अभिनेत्याच्या ‘या’ एक्स गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा
Sushant Singh Rajput: '... म्हणून मी सुशांतला ब्लॉक केलं', अभिनेत्याच्या मृत्यूपूर्वी नक्की काय झाल? सुशांत सिंह राजपूतच्या 'या' एक्स गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा, निधनानंतर देखील अभिनेत्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात.

Sushant Singh Rajput: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत. 14 जून 2020 मध्ये सुशांत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. करीयर यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याने स्वतःला का संपवलं… हे अद्यापही एक रहस्यच आहे. सुशांतच्या निधनानंतर देखील अभिनेत्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. आता देखील अभिनेत्याच्या एक्स गर्लफ्रेंडने अभिनेत्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सांगायचं झालं तर, सुशांत याचं नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं.
सुशांत याचं निधन झालं तेव्हा अभिनेता, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती समोर आहे. याच कारणामुळे सुशांतच्या मृत्यूनंतर रियाला तुरुंगवास देखील भोगावा लागला. दरम्यान, रिया आज देखील सुशांत याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असते.
View this post on Instagram
एका मुलाखतीत रिया म्हणाली, सुशांतचा मला शेवटचा मेसेज आला होता. ज्यामध्ये त्याने मला विचारलं, ‘तू कशी आहेस बाबू? कारण त्याला माहिती होतं माझी प्रकृती ठिक नाही. दुपारी मला त्याचा मेसेज आला होता, पण त्याने मला कॉल केला नाही. जेव्हा त्याचा मेसेज आला मी प्रचंड दुःखी होती…’
View this post on Instagram
‘त्याने मला फक्त एक मेसेज करून माझी विचारपूस केली… त्यामुळे मी अधिक दुःखी होती. त्याला माहिती होतं की मी चिंतेत आहे आणि माझी प्रकृती देखील खालावलेली होती. त्यामुळे 9 जून रोजी मी त्याला ब्लॉक केलं होतं. सुशांतला मी त्याच्या आयुष्यात नकोय असं मला वाटत होतं…’ जुन्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली होती, ‘मला सुशांत आणि त्याच्या बहिणीमध्ये यायचं नव्हतं.’ रिया कायम सुशांत याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल बोलताना दिसते.
