सुशांत सिंह राजपूतला घरी काय म्हणायचे कुटुंबिय? मित्रांमध्ये होती अभिनेत्याची खास ओळख…
Sushant Singh Rajput 5th Death Anniversary: चाहत्यांसाठी सुशांत तर कुटुंबियांसाठी कोण होता अभिनेता, सुशांतला घरी काय म्हणायचे कुटुंबिय? मित्रांमध्ये देखील चाहत्यांची होती खास ओळख

Sushant Singh Rajput 5th Death Anniversary: 2020 हे वर्ष फक्त भारतासाठी नाही तर, संपूर्ण जगासाठी फार धोक्याचं होतं. यासाठी कारण आहे कोरोना व्हायरस… 2020 मध्ये कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला होता. तर दुसरीकडे अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. 14 जून 2020 मध्ये सुशांत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी स्वतःचं आयुष्य संपवलं. अभिनेत्याच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली तर, अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आजही अभिनेत्याच्या मृत्यूवर चाहते आणि कुटुंबिय शोक व्यक्त करत असतात.
सुशांत याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून त्याने चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि अचानक चाहत्यांनी सोडून गेला. चाहत्यांसाठी सुशांत असलेला अभिनेता कुटुंबियांसाठी मात्र ‘हसमुख’ होता. फार कमी लोकांना माहिती आहे की, सुशांत याला कुटुंबिय ‘गुलशन’ या नावाने हाक मारायचे. ‘गुड्डू’ म्हणून देखील अभिनेत्याला कुटुंबिय लाडाने बोलवायचे.
मित्रांमध्ये देखील सुशांत अनेक नावांनी प्रसिद्ध होता. ‘सेन्ट कॅरेन्स का एल्युमनी’, ‘राजीव नगर का छोरा’, ‘कॅप्टन’ अशा अनेक नावांनी सुशांतला मित्र हाक मारायचे. सुशांत याच्या निधनाला पाच वर्ष झाली आहेत. पण अभिनेत्याच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत.
सुशांत सिंह राजपूत याचं निधन 14 जून 2020 मध्ये झालं होतं. प्राथमिक माहितीनुसार, त्याच्या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचे सांगण्यात आलं होतं, त्याचबरोबर तो अनेक दिवसांपासून नैराश्याने ग्रस्त असल्याचेही सांगण्यात आलं.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी देखली करण्यात आली. त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण ‘गुदमरल्याने’ असं म्हटलं होतं. या हाय-प्रोफाइल प्रकरणाबाबत देशभरात बराच गदारोळ झाला होता.
सुशांत सिंग राजपूत याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 2011 पर्यंत ‘पवित्र रिश्ता’ मालिकेसाठी काम केलं. त्यानंतर अभिनेत्याने स्वतःचा मोर्चा बॉलिवूडच्या दिशेने वळवल. अभिनेत्याने ‘काय पो चे’ सिनेमानंतर ‘एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी’, ‘राबता’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारखे हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचं नाव ‘दिल बेचारा’ होतं. अभिनेच्याच्या मृत्यूनंतर सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला.