AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC | तब्बल 14 वर्षे, 3740 एपिसोड्सनंतर अखेर जेठालालच्या आयुष्यात आला ‘तो’ सुवर्णक्षण, पहा व्हिडीओ

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतेय. यातील काही कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला, तर काहींची जागा नव्या कलाकारांनी घेतली. मात्र तरीसुद्धा या मालिकेच्या टीआरपीमध्ये फारसा फरक पडला नाही. यामध्ये अभिनेते दिलीप जोशी हे जेठालाल तर मुनमुन दत्ता या बबिता अय्यरची भूमिका […]

TMKOC | तब्बल 14 वर्षे, 3740 एपिसोड्सनंतर अखेर जेठालालच्या आयुष्यात आला 'तो' सुवर्णक्षण, पहा व्हिडीओ
Jethalal and BabitaImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 15, 2023 | 9:34 AM
Share

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतेय. यातील काही कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला, तर काहींची जागा नव्या कलाकारांनी घेतली. मात्र तरीसुद्धा या मालिकेच्या टीआरपीमध्ये फारसा फरक पडला नाही. यामध्ये अभिनेते दिलीप जोशी हे जेठालाल तर मुनमुन दत्ता या बबिता अय्यरची भूमिका साकारत आहेत. जेठालालला बबिताजी किती आवडते हे ‘तारक मेहता..’च्या प्रेक्षकांना चांगलंच ठाऊक असेल. मात्र आता तब्बल 14 वर्षांनंतर जेठालालच्या मनाची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये जेठालालला चक्क बबिता मिठी मारते. त्यानंतर जे काही घडतं, ते पाहून प्रेक्षकांनाही हसू आवरत नाही. एपिसोडमधील हा भाग तारक मेहताच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. तब्बल 3740 एपिसोड्सनंतर जेठालालच्या आयुष्यात असा क्षण आल्याने नेटकऱ्यांनाही व्यक्त होण्याचा मोह आवरत नाहीये. ’14 वर्षांचा वनवास पूर्ण झाला’, असं एका चाहत्याने लिहिलं आहे. तर ‘जेठालालला मोक्ष प्राप्त झाला’, अशी मस्करी दुसऱ्या युजरने केली. ‘जेठालालचं आयुष्य सफल झालं’, असंही एकाने म्हटलंय.

या लोकप्रिय मालिकेने आतापर्यंत 3740 एपिसोड्स पूर्ण केले. अगदी पहिल्या एपिसोडपासून जेठालालला बबिता आवडत असल्याचं पहायला मिळालं. तिच्यासाठी जेठालाल काहीही करण्यासाठी तयार असतो. मात्र या दोघांमध्ये आजवर असा कोणताच सीन दाखवण्यात आला नव्हता, ज्यामध्ये त्यांची जवळीक पहायला मिळेल. अखेर तो क्षण आल्याने चाहते या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

पहा व्हिडीओ

काही दिवसांपूर्वीच या मालिकेत नव्या टप्पूची एण्ट्री झाली. अभिनेता नितीश भलूनी याने मालिकेत राज अनाडकतची जागा घेतली आहे. तर या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी परतणार आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. दयाबेन मालिकेत कधी येणार याविषयी दिलीप यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “हे तर निर्मात्यांवर अवलंबून आहे. मालिकेत नवीन अभिनेत्री आणायची की नाही, याचा निर्णय तेच घेतील. एक कलाकार म्हणून मला दयाच्या भूमिकेची खूप आठवण येते. बऱ्याच काळापासून प्रेक्षकांनीही दया आणि जेठा यांच्यामधील मजेशीर सीन्सचा आनंद लुटला आहे. जेव्हापासून दिशा या मालिकेतून निघून गेली, तेव्हापासून तो भाग, तो अँगल, ती मजामस्ती गायब आहे. बघुयात, मी तर नेहमीच सकारात्मक विचार करतो. असित भाईसुद्धा नेहमी सकारात्मक असतात. त्यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही.”

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.