Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात सोन्याचा शूज घेऊन आला हा स्पर्धक; किंमत कळताच..

मूर्ती लहान पण किर्ती महान; सोन्याच्या शूजने वेधलं स्पर्धकांचं लक्ष

Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात सोन्याचा शूज घेऊन आला हा स्पर्धक; किंमत कळताच..
अब्दूच्या शूजची किंमत वाचून डोळे विस्फारतील!Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 7:23 PM

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) हा शो सुरू झाला आहे. अगदी पहिल्या एपिसोडपासून हा शो चर्चेत आहे. यंदाच्या सिझनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये तजाकिस्तानचा गायक अब्दू रोझिक (Abdu Rozik) याचाही समावेश आहे. अब्दूने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. किंबहुना खास त्याच्यासाठीच शोज पाहत असल्याचे कमेंट्स नेटकरी सोशल मीडियावर करत आहेत. 19 वर्षीय अब्दू कधी त्याच्या गायकीमुळे तर कधी टिना दत्तासोबतच्या रोमान्समुळे चर्चेत असतो. आता अब्दू त्याच्या सोन्याच्या शूजमुळे (Golden Shoes) सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

बिग बॉसच्या आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये टिना दत्ता ही अब्दूकडून त्याचे शूज चोरताना दिसतेय. हे सोन्याचे शूज तब्बल 40 हजार डॉलर्सचे असल्याचं अब्दू सांगतो. बाजूला उभे असलेले अंकित आणि गौतम हे ऐकून थक्क होतात.

हे सुद्धा वाचा

शूजची किंमत ऐकल्यानंतर अंकितसुद्धा ते चोरण्याचा प्रयत्न करतो. टिना पुन्हा तो शूज आपल्या हातात घेते आणि स्वत:जवळच ठेवणार असल्याचं सांगते. अशातच गौतम विग त्या शूजवरील 24 कॅरेट गोल्ड स्टीकर काढण्याचा प्रय़त्न करतो. तेव्हा अब्दू म्हणतो, या शूजची खरी किंमत चाळीस नाही तर पाच हजार डॉलर आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

शूजची खरी किंमत ऐकल्यानंतर इतर स्पर्धक म्हणतात, “चाळीस नाही तरी पाच हजार डॉलरसुद्धा काही कमी नाही. आम्हाला ते शूज हवे आहेत.” या चर्चेदरम्यान अब्दू हळूच त्याचा शूज टिनाच्या हातातून परत घेतो आणि लगेच आतमध्ये जाऊन बॅगेत ठेवतो.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘या शोचा विजेता अब्दूच आहे. मी फक्त त्याच्यासाठी हा शो बघते’, अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘अब्दूशिवाय बाकीचे सगळे कंटाळवाणे आहेत’, असं दुसऱ्याने लिहिलं. अनेकांनी यंदाचा सिझन खूपच रटाळवाणं असल्याची तक्रारही केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.