सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर आता शहनाज गिल सावरण्याचा प्रयत्न करतेय, अभिनव-रुबिनाने घेतली भेट!

टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याने 2 सप्टेंबर रोजी या जगाचा निरोप घेतला आहे. पण आजही त्याच्या आठवणी कुटुंब, मित्र आणि चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. सिद्धार्थच्या जाण्याने त्याच्या आईला आणि मैत्रीण शहनाज गिलला (Shehnaaz Gill) सर्वात मोठा धक्का बसला आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर आता शहनाज गिल सावरण्याचा प्रयत्न करतेय, अभिनव-रुबिनाने घेतली भेट!
Sidharth-shehnaaz

मुंबई : टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याने 2 सप्टेंबर रोजी या जगाचा निरोप घेतला आहे. पण आजही त्याच्या आठवणी कुटुंब, मित्र आणि चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. सिद्धार्थच्या जाण्याने त्याच्या आईला आणि मैत्रीण शहनाज गिलला (Shehnaaz Gill) सर्वात मोठा धक्का बसला आहे. शहनाज सिद्धार्थवर खूप प्रेम करत होती आणि तिने स्वतः टीव्हीवर हे अनेक वेळा सांगितले आहे. अभिनेत्याच्या निधनाने शहनाज खूपच कोलमडली आहे.

आता अभिनव शुक्लाने (Abhinav Shukla) शहनाजची स्थिती सांगितली आहे. स्पॉटबॉयशी बोलताना अभिनवने सांगितले की, तो आणि त्याची पत्नी रुबिना दिलैक (Rubina Dilaik) शहनाजच्या आईला भेटले. अभिनेता म्हणाला, मी सिद्धार्थच्या कुटुंबासाठी आणि शहनाज गिलसाठी प्रार्थना करतो. शहनाज आता बरी होत आहे. मी आणि रुबीना शहनाजच्या आईला भेटलो. शहनाज आता यातून सावरण्याचा प्रयत्न करतेय.

सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळी शहनाज खूपच वाईट अवस्थेत होती. याआधी राहुल महाजन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, अंत्यसंस्काराच्या वेळी शहनाज ओरडली होती की ‘मम्मी जी मेरा बच्चा जा राहा है’. याशिवाय ती सतत सिद्धार्थचे पाय घासत होती, तेही हे माहीत असताना की, तो आता या जगात नाही. अनेक वेळा शहनाज बेशुद्ध पडली. राहुलने असेही सांगितले होते की, शहनाजची अवस्था पाहून तो खूप घाबरला होता आणि अभिनेत्रीची अशी अवस्था पाहून तो जास्त वेळ तिथे राहू शकला नाही.

शहनाज आणि सिद्धार्थ यांची भेट कशी झाली?

सिद्धार्थ आणि शहनाज ‘बिग बॉस 14’मध्ये स्पर्धक म्हणून आले होते. शो दरम्यानच शहनाज सिद्धार्थच्या प्रेमात पडली. ती सिद्धार्थला हे अनेक वेळा सांगत असे. पण सिद्धार्थ यील नेहमी स्वतःची चांगली मैत्रीण मानत असे. दोघांचीही केमिस्ट्री चाहत्यांना शोमध्ये खूप आवडली आणि त्यांनी या जोडीला ‘सिडनाज’ असे नाव दिले होते.

शोमधून बाहेर पडल्यानंतरही शहनाज अनेक मुलाखतींमध्ये म्हणायची की, तिला सिद्धार्थ आवडतो. पण नेहमीप्रमाणे सिद्धार्थने तिला मैत्रीण म्हटले. मात्र, अभिनेता नेहमीच असे म्हणत असे की, शहनाज त्याच्या खूप जवळ आहे. सिद्धार्थ आणि शहनाज पुन्हा एकदा म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले आणि दोघांच्या गाण्यांना प्रेक्षकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

‘डान्स दिवाने’च्या सेटवर दिसले एकत्र

सिद्धार्थच्या मृत्यूच्या काही दिवस आधी दोघेही ‘बिग बॉस ओटीटी’ आणि डान्स दिवाने 3 च्या सेटवर एकत्र दिसले होते. ‘डान्स दिवाने 3’मध्ये दोघांनीही एकत्र रोमँटिक परफॉर्मन्स दिला होता, ज्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

हेही वाचा :

Happy Birthday Ayushmann Khurrana | अभिनेता होण्यापूर्वी रेडिओ जॉकी म्हणूनही प्रसिद्ध होता आयुष्मान खुराना, जाणून घ्या काही खास गोष्टी!

Lookalike : मर्लिन मुनरोच्या ‘या’ कार्बन कॉपी पाहून तुम्ही देखील व्हाल अवाक्, पाहा फोटो…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI