Bigg Boss 16 | ‘त्या’ प्रकारानंतर सलमान खान टीना दत्ता हिच्यावर भडकला, हा नेमका कोणता गेम?

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 06, 2023 | 4:06 PM

या पार्टीमध्ये फक्त घरातील सदस्यच नाही तर काही प्रेक्षकही सहभागी झाले होते.

Bigg Boss 16 | 'त्या' प्रकारानंतर सलमान खान टीना दत्ता हिच्यावर भडकला, हा नेमका कोणता गेम?

मुंबई : बिग बाॅस 16 मध्ये मोठा हंगामा होताना दिसत आहे. नुकताच बिग बाॅस 16 चा एक प्रोमो व्हायरल झालाय. हा प्रोमो विकेंडच्या वारचा आहे. विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा टीना दत्ताचा क्लास घेताना दिसत आहे. टीना दत्ता ही बिग बाॅसच्या घरात राहण्याठी लव अँगल तयार करताना दिसत आहे. न्यू इयर पार्टीमध्ये टीना आणि शालिन हे असे काही करतात, की ते पाहुण अनेकांना मोठा धक्का बसला. न्यू इयर पार्टी बिग बाॅसच्या घरात ठेवण्यात आली होती. या पार्टीमध्ये फक्त घरातील सदस्यच नाही तर काही प्रेक्षकही सहभागी झाले होते.

न्यू इयर पार्टीच्या अगोदरच टीना दत्ता आणि शालिन भनोट यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाले होते. परंतू गाणे सुरू होताच टीना आणि शालिन एकमेकांच्या अगदी जवळ येत डान्स करत होते. ही गोष्ट घरातील सर्व सदस्यांना खटकली होती.

टीना बिग बाॅसच्या घरात राहण्यासाठी लव अँगल करत असल्याचा आरोप सातत्याने केला जातोय. सलमान खान याच गोष्टीवरून विकेंडच्या वारमध्ये टीना दत्ता हिचा क्लास घेणार आहे. सलमान खान शालिनला म्हणतो की, सर्वांना हे कळत आहे, टीना तुझा फक्त फायदा घेत आहे…

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

सलमान खान म्हणतो की, टीना दत्ता तू नेमका कोणता गेम खेळत आहे. तुझे हे फेक रिलेशन लोकांना दिसत आहे. यावर टीना म्हणते, मी शालिनला आताच थोड्या वेळापूर्वी सांगितले की आपले काहीच होऊ शकत नाही.

टीना दत्तानंतर सलमान खान हा अर्चना गाैतम आणि एमसी स्टॅनचा देखील क्लास घेतो. कारण एमसी आणि अर्चना यांच्यामध्ये भांडणे झाली होती आणि या भांडणामध्ये त्यांनी एकमेकांच्या घरच्यांना देखील शिव्या दिल्या होत्या.

अर्चनाला सलमान खान म्हणतो, तुला जर एखाद्याच्या पर्सनल लाईफवर जाऊन कमेंट करून भांडणे करायची असतील तर तुझ्यासाठी बिग बाॅसच्या घराचा दरवाजा उघडा आहे. तू आताही बिग बाॅसच्या घराबाहेर पडू शकते.

सोशल मीडियावर आता हाच प्रोमो तूफान व्हायरल होताना दिसतोय. विकेंडचा वार धमाकेदार होणार हे नक्की आहे. यावेळी बिग बाॅसच्या घरात एक टास्क देखील पार पडणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI