AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devmanus | लगीनघाईच्या नादात ‘देवमाणूस’ फसणार, ACP दिव्या ‘देवी सिंग’ला अखेर अटक करणार!

सध्या अजित आणि डिंपलच्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागते. इकडे दिव्या अजितच्या विरोधात पुरावे गोळा करतेय. अजित अस्वस्थ आहे. सरू आज्जी देखील हे लग्न होऊ देणार नाही यावर ठाम आहे. आता जशी या लग्नाची उत्सुकता आहे, तशीच देवी सिंगला अटक कधी होणार, याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

Devmanus | लगीनघाईच्या नादात ‘देवमाणूस’ फसणार, ACP दिव्या ‘देवी सिंग’ला अखेर अटक करणार!
देवमाणूस
| Updated on: May 27, 2021 | 6:32 PM
Share

मुंबई : एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ (Devmanus) ही नवी मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. ‘देवमाणूस’ ही मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय. कारण, या मालिकेतील अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. इतकेच नव्हे तर, मालिकेत आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना लागून राहिली आहे (Devmanus Fame Actor Kiran Gaikwad share new promo of serial).

सध्या अजित आणि डिंपलच्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागते. इकडे दिव्या अजितच्या विरोधात पुरावे गोळा करतेय. अजित अस्वस्थ आहे. सरू आज्जी देखील हे लग्न होऊ देणार नाही यावर ठाम आहे. आता जशी या लग्नाची उत्सुकता आहे, तशीच देवी सिंगला अटक कधी होणार, याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. नुकत्याच आलेल्या एका प्रोमोमध्ये या लग्नसोहळ्या दरम्यान डॉ. अजितकुमार उर्फ ‘देवी सिंग’ पोलिसांच्या तावडीत सापडल्याचे दिसते आहे.

पाहा नवा प्रोमो :

एकापाठोपाठ एक खून पाडणाऱ्या देवीसिंहला पोलीस ताब्यात घेणार असल्याचे फोटो देखील नुकतेच व्हायरल झाले होते. ‘देव माणूस’ अर्थात डॉ. अजितकुमार देवची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याने नुकतेच काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. आता हा नवा प्रोमो देखील त्यानेच सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडणार, याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे (Devmanus Fame Actor Kiran Gaikwad share new promo of serial).

डॉक्टरचा फुलप्रूफ प्लॅन

सध्या एसीपी दिव्या सिंहला डॉक्टरच देवी सिंग असल्याचं समजलं आहे. मात्र पुरेशा पुराव्यांअभावी त्याला पकडलं, तर तो हातावर तुरी देऊन निसटेल. याशिवाय गावकऱ्यांचा रोष पत्करावा लागेल, तो वेगळाच, याची भीती दिव्याला आहे. त्यामुळे ती डॉक्टरला जाळ्यात ओढून गाफील ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टर लग्नाच्या बेडीत अडकण्याआधी आपण त्याला बेड्या घालू, असा इरादा त्याने व्यक्त केला आहे.

दरम्यान, अजितकुमारनेही आपल्या बाजूने पुरेशी वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे पोलीस त्याला पकडायला आले, तर डिंपलसोबतच मंगल, बाबू, बजा, नाम्या आणि समस्त गावकरी त्याला पाठीशी घालणार यात वाद नाही. त्यामुळे सहानुभूतीचा फटका न बसू देता त्याला बेफिकीर ठेवत पुरावे जमा करण्याचा प्लॅन दिव्या आखत आहे.

सरु आजी राडा करण्याच्या तयारीत

दुसरीकडे, डिंपलची आजी अर्थात सरु आजीचा या लग्नाला कडकडून विरोध आहे. हा डॉक्टर नाही, तर कम्पाऊण्डर आहे, हा तिचा धोशा सुरुवातीपासून कायम आहे. त्यातच घरच्यांनी दोघांच्या लग्नाची तयारी सुरु केल्याने आजी चिडली आहे. मात्र कितीही तयारी करा, असा राडा करेन, की हे लग्नच होऊ देणार नाही, असा थेट इशाराच तिने दिला आहे. त्यामुळे अजित आणि डिंपलचं लग्न होणार की नाही, याची उत्सुकता चाळवली गेली आहे.

(Devmanus Fame Actor Kiran Gaikwad share new promo of serial)

हेही वाचा :

Devmanus | ‘देवमाणूस’ अखेर पोलिसांच्या तावडीत सापडणार? अभिनेत्याने फोटो शेअर करत दिले संकेत!

Devmanus | ‘देवमाणसा’च्या पापाचा घडा भरला, देवी सिंग विरुद्धचे पुरावे ACP दिव्याच्या हाती!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.