AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमाच्या नात्यात रुबिनाने घेतला पुढाकार, फूट पडताच सावरली एकमेकांची बाजू, वाचा रुबिना-अभिनवची प्रेमकथा!

टीव्हीची लोकप्रिय आणि आवडती जोडी रुबिना दिलैक (Rubina Dilaik) आणि अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) यांची प्रेमकथा आजच्या जोडप्यांसाठी खूप प्रेरणादायक आहे. दोघांनीही आपल्या नात्यात बरेच चढउतार पाहिले, पण तरीही त्यांनी त्यांचे नाते तुटू दिले नाही.

प्रेमाच्या नात्यात रुबिनाने घेतला पुढाकार, फूट पडताच सावरली एकमेकांची बाजू, वाचा रुबिना-अभिनवची प्रेमकथा!
रुबीना दिलैक-अभिनव शुक्ला
| Edited By: | Updated on: Jun 13, 2021 | 7:50 AM
Share

मुंबई : टीव्हीची लोकप्रिय आणि आवडती जोडी रुबिना दिलैक (Rubina Dilaik) आणि अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) यांची प्रेमकथा आजच्या जोडप्यांसाठी खूप प्रेरणादायक आहे. दोघांनीही आपल्या नात्यात बरेच चढउतार पाहिले, पण तरीही त्यांनी त्यांचे नाते तुटू दिले नाही. 3 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीही कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थित हिमाचलमध्ये लग्न केले होते. यानंतर हे दोघेही मुंबईत आले आणि इंडस्ट्रीतील लोकांने त्यांचे भव्य स्वागत केले (Love story of actress Rubina Dilaik and Abhinav Shukla).

मात्र, यांचा हा प्रवास सोपा नव्हता. प्रत्येक समस्येचा सामना करून दोघांनीही त्यांचे वैवाहिक जीवन कसे मजबूत केले, याची कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायक आहे.

कशी झाली भेट?

गणेश चतुर्थीनिमित्त दोघेही एका मित्राच्या घरी भेटले होते. पहिल्या भेटीबद्दल सांगताना अभिनव म्हणाला होता की, ‘मी रुबिनाला एका मित्राच्या घरी भेटलो होतो. मी रुबिनाला पाहिले आणि त्यावेळी तिने साडी परिधान केली होती. साधारणत: आपण मुलींना पाश्चात्य कपड्यांमध्ये पाहतो, पण जेव्हा मी रुबिनाला पाहिले तेव्हा ती साडीमध्ये दिसली आणि त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यानंतर अभिनवने रुबिनाला एक फोटोशूट करवून घेण्यास सांगितले.

रुबिनाने उचलले पहिले पाऊल

रुबिना म्हणाली होती, ‘तुम्ही काय विचार करता, तुम्ही काय कल्पना करता, हे अगदी तसेच आहे. म्हणून मी त्याला गमावू इच्छित नाही. हिऱ्याची पारख फक्त जोहरीलाच असते आणि मला हा हिरा गमवायचा नव्हता. यामुळे मी या नात्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे. यानंतर या दोघांनी 2015 साली डेटिंग करण्यास सुरुवात केली.

‘हे’ नाते आहे खास!

या दोघांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांच्या नात्याविषयी खास गोष्ट म्हणजे दोघांच्याही आवडी एकसारख्या आहेत. या दोघांनाही कॉफी आणि ट्रॅव्हल या दोन्हीची आवड आहे. याशिवाय अभिनवला फोटो क्लिक करणे आणि रुबिनाला फोटोशूट करायला आवडते.

अभिनव एक सरप्राईज बॉक्स असल्याचे रुबिनाने म्हटले होते. तो आपल्याला नेहमी आश्चर्यचकित करतो. जेव्हा जेव्हा मी त्याला काहीतरी नवीन करताना पाहते, तेव्हा मी त्याच्याकडे अधिक आकर्षित होते. मी भाग्यवान आहे की तो माझ्या आयुष्यात आहे. अभिनवने मला उडण्यासाठी पंख दिले आहेत. तो मला नेहमीच प्रेरणा देतो.

त्याचवेळी अभिनव म्हणाला होता की, आम्ही दोघेही एकमेकांच्या कामाबद्दल उत्सुक आहोत. ती माझ्याबरोबर तिच्या कामाविषयी चर्चा करते आणि मी रुबिनाबरोबर माझ्या प्रोजेक्ट्सविषयी चर्चा करतो.

रुबिनाची पूर्ण काळजी घेतो!

डेटिंगच्या वेळी, जेव्हा रुबिना शूटवर गेली तेव्हा अभिनवने तिच्यासाठी एक खास रेफ्रिजरेटर घेतला होता, ज्यात तिच्यासाठी सलाड, अन्न आणि निरोगी पेय ठेवलेले होते. शूटच्या दरम्यान रुबिनाने तिच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी, अशी त्याची इच्छा होती.

हिमाचलमध्ये बांधली लग्नगाठ

3 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीही कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थित हिमाचलमध्ये लग्न केले होते. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

समस्यांशी दोन हात

रुबिना आणि अभिनव यांच्या नात्यातही अनेक अडचणी आल्या होत्या, पण दोघांनी हार मानली नाही. त्यांच्या नात्यास आणखी एक संधी देण्यासाठी त्यांनी बिग बॉसमध्ये भाग घेतला आणि त्यांच्या नात्यातील दरी मिटवली. दोघांमधील नातं आता आणखी घट्ट झालं आहे. दोघेही आता पुन्हा आपल्या विवाहित जीवनाचा आनंद घेत आहेत.

(Love story of actress Rubina Dilaik and Abhinav Shukla)

हेही वाचा :

Photo : ‘या’ अभिनेत्याच्या कन्येची सोशल मीडियावर चर्चा; हिच्यासमोर अंगुरी भाभी, गोरी मेमही फिक्या

Video | ‘दिल को करार आया…’, क्लासिकल लूकसह नेहाच्या अदांनी घायाळ झाले चाहते, पाहा व्हिडीओ

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.