तैमूर, जहांगीर नाही आता चर्चा सपना चौधरीच्या मुलाच्या नावाची! ‘हरयाणवी क्वीन’ने बर्थडे पोस्टमध्ये सांगितलं नाव…

‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरी (Sapna Choudhary) गेल्या वर्षभरापासून तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धी झोतात आहे. आज 5 ऑक्टोबर हा दिवस सपना चौधरीसाठी खूप खास आहे, कारण आज तिच्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे.

तैमूर, जहांगीर नाही आता चर्चा सपना चौधरीच्या मुलाच्या नावाची! ‘हरयाणवी क्वीन’ने बर्थडे पोस्टमध्ये सांगितलं नाव...
Sapna Chaudhary
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Oct 05, 2021 | 12:35 PM

मुंबई : ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरी (Sapna Choudhary) गेल्या वर्षभरापासून तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धी झोतात आहे. आज 5 ऑक्टोबर हा दिवस सपना चौधरीसाठी खूप खास आहे, कारण आज तिच्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे आणि या खास प्रसंगी तिने आपल्या मुलाच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.

अर्थात, सपनाने या व्हिडीओमध्ये आपल्या मुलाचा चेहरा दाखवला नाही. पण हो, तिने कॅप्शनमध्ये नक्कीच तिचे नाव चाहत्यांसोबत शेअर केले आहे. सपनाने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझ्याकडून आणि माझ्या प्रियजनांकडून तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझा शेर @porusofficial …’ सपनाच्या मुलाचे नाव पोरस आहे.

पाहा व्हिडीओ :

सपनाचा नवरा वीर साहूने दिला आवाज

सपना चौधरीने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सपनाचा मुलगा जमिनीवर बसून गायींसोबत खेळताना दिसत आहे. पार्श्वभूमीवर एक व्हॉईस ओव्हर ऐकू येतो, ज्यामध्ये सुंदर शब्द निवडले गेले आहेत. हा आवाज तिचा पती वीर साहू याचा आहे.

सपना चौधरीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याचबरोबर चाहते सतत कमेंट करत सपनाच्या मुलाला आशीर्वाद देताना दिसतात. आम्ही तुम्हाला सांगू की, सपना चौधरीचे नाव सर्वात लोकप्रिय डान्सर आणि गायकांच्या यादीत येते. सपनाची सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलोइंग आहे. चाहत्यांना तिची शैली खूप आवडते. तिने एका पेक्षा एक हिट गाणी दिली आहेत.

मृत्यूची अफवा चर्चेत

हरियाणवी नृत्यांगना सपना चौधरी (Sapna Choudhary) हे हरियाणातच नव्हे तर मनोरंजन विश्वातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. तिची फॅन फॉलोइंग एका मोठ्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. आजही लाखो प्रेक्षक सपनाचे स्टेज शो पाहण्यासाठी एकत्र जमत असतात. सपना केवळ तिच्या नृत्यासाठीच नव्हे तर, तिच्या फोटोंमुळेही चर्चांमध्ये राहिली आहे. ती सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असते.

सपनाने तिचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करून नेहमीच चाहत्यांना आश्चर्यचा धक्का दिला आहे. नुकतीच सपना चौधरी बद्दल एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली होती. सपना चौधरीबद्दल सोशल मीडियावर अशा अफवा पसरल्या होत्या की, तिचा रस्ते अपघातादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचवेळी, या बातमीनंतर लोकांनी तिला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली होती. तथापि, ही केवळ एक अफवा होती आणि ती तिच्या कुटुंबासह पूर्णपणे ठीक असल्याचे, तिच्या प्रवक्त्याने सांगितले.

सध्या काय करतेय अभिनेत्री?

सपना चौधरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती आजकाल ‘& टीव्ही’चा क्राईम शो ‘मौका-ए-वारदत’मध्ये रवी किशन आणि मनोज तिवारी यांच्यासह शो होस्ट करताना दिसत आहे. याशिवाय सपनाने हरियाणवी इंडस्ट्री, भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. तिने ‘दोस्ती के साईड इफेक्ट्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सपना चौधरी ‘बिग बॉस 11’ चा भाग राहिली आहे.

हेही वाचा :

आपल्याच वडिलांना भेटण्यासाठी आर्यनला घ्यावी लागायची अपॉईंटमेंट, NCB कस्टडीत शाहरुखच्या लेकाचा खुलासा!

‘पत्नी म्हणून मला समीरचा खूप अभिमान!’, अभिनेत्री क्रांती रेडकरकडून ‘सिंघम’ अधिकारी समीर वानखेडेंचं कौतुक!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें