Devmanus | देवीसिंगचा जुळा भाऊ डॉ. अजित कुमार देव? ‘देवमाणूस’ मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट!

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत डॉ. अजित कुमार देव उर्फ देवीसिंग याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावरील गुन्हे सिद्ध करण्यासाठी कोर्ट केस सुरु झाली आहे.

Devmanus | देवीसिंगचा जुळा भाऊ डॉ. अजित कुमार देव? ‘देवमाणूस’ मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट!
देवमाणूस
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 4:17 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत डॉ. अजित कुमार देव उर्फ देवीसिंग याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावरील गुन्हे सिद्ध करण्यासाठी कोर्ट केस सुरु झाली आहे. तुरुंगात असूनही या ‘देवमाणसा’चे कारनामे अद्याप सुरुच आहेत (Zee Marathi Devmanus serial Big twist in story Devising have twin brother Dr Ajit Kumar Dev).

डॉ. अजित कुमार देवच देवीसिंग आहे हे पटवून देण्यासाठी तो कंपाऊंडर म्हणून काम करत असलेल्या मुंबईतील डॉक्टरांना साक्ष देण्यासाठी कोर्टात हजर केले गेले होते. मात्र, या दरम्यान देखील त्याने अनेक उलट प्रश्नांचा भडीमार करत त्या डॉक्टरांची साक्ष पिटाळून लावली. मात्र, तोच देवीसिंग नसल्याचे त्याचे म्हणणे खरे करण्यासाठी तो नवनवीन क्लृप्त्या काढत आहे.

खरंच देवीसिंगला जुळा भाऊ?

मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली असतानाच यात आणखी एक मोठा ट्वीस्ट आला आहे. मालिकेच्या नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोत दोन अजित कुमार देव दाखवण्यात आले आहेत. अर्थात यातील एक देवीसिंग आहे, तर दुसरा डॉ. अजित कुमार देव. हे दोघेही एकमेकांचे जुळे भाऊ असल्याचे म्हटले गेले आहे. डॉ. अजित कुमार देव या संभाषणादरम्यान आपल्या आई-वडिलांच्या मृत्यूचा दोष आपल्या जुळ्या भावलं अर्थात देवीसिंगला देताना दिसतो. मात्र, यावेळी देवीसिंग आपल्या डॉक्टर भावाचा खून करताना दाखवला आहे. तर दुसरीकडे डॉ. अजितकुमार देव आपला भाऊ असल्याचे देविसिंग डिंपलला सांगताना दाखवलं आहे. त्यामुळे आता खरंच देवीसिंगला भाऊ होता का? आणि त्याचा खून करून देवीसिंग डॉ. अजितकुमार देव बनलाय? की या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडण्यासती तो पुन्हा एकदा केवळ थापा मारतोय, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

पाहा नवा प्रोमो :

सध्या मालिकेत डॉक्टर अजितकुमार देव याची कोर्टात केस चालू आहे आणि सरकारी वकील आर्या यांच्या विरुद्ध अजित स्वतःची केस स्वतः लढतोय. खूप चतुराईने अजित सगळ्यांची साक्ष घेऊन आपण कसे निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यात कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय.

तपासात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

तसंच आता मालिकेत एसीपी दिव्या सिंग हिच्या हाताखाली नवीन पोलिस अधिकारी इन्स्पेक्टर शिंदे देखील या केसमध्ये लक्ष घालणार आहेत. त्यामुळे आता एसीपी दिव्या, इन्स्पेक्टर शिंदे आणि ऍडव्होकेट आर्या हे तिघे मिळून अजितकुमारला फासावर लटकवण्यात यशस्वी होतील का?, हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

(Zee Marathi Devmanus serial Big twist in story Devising have twin brother Dr Ajit Kumar Dev)

हेही वाचा :

PHOTO | ‘अरुंधती’ नव्हे ‘अनुपमा’, ‘अनिरुद्ध’ नव्हे ‘वनराज’, जेव्हा ‘आई कुठे काय करते’ आणि ‘अनुपमा’ एकत्र येतात!

Devmanus | कोरोना, लॉकडाऊन, चित्रीकरण अन् कोर्टातच झालं ‘डिंपल’च्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.