मराठीतल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेरित झालेल्या दिग्दर्शकाने हिंदीतही अशीच एका मालिका बनवण्याचा निर्धार केला आणि यातूनच स्टार प्लसच्या ‘अनुपमा’ या मालिकेची निर्मिती झाली.
Jun 30, 2021 | 2:33 PM
स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु असलेली ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
1 / 10
मराठीतल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेरित झालेल्या दिग्दर्शकाने हिंदीतही अशीच एका मालिका बनवण्याचा निर्धार केला आणि यातूनच स्टार प्लसच्या ‘अनुपमा’ या मालिकेची निर्मिती झाली.
2 / 10
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉक डाऊन सदृश्य निर्बंध यामुळे मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प झाले होते.
3 / 10
अशा परीस्थित काही मालिकांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन मालिकांचे चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.
4 / 10
याच दरम्यान लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते?’चे चित्रीकरण सिल्व्हासामधील खानवेल रिसॉर्टमध्ये तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आले होते.
5 / 10
याचवेळी इथे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या टीमसह, हिंदीतील ‘आई कुठे काय करते’ म्हणजेच ‘अनुपमा’ या मालिकेची टीम देखील चित्रीकरणासाठी हजर होती.
6 / 10
सारखे कथानक, कलाकारांचे प्रतिबिंब असणारी ही टीम या दरम्यान खूप धमाल आणि मस्ती करत होती.
7 / 10
‘आई कुठे काय करते’ मधील ‘अनिरुद्ध देशमुख’ अर्थात अभिनेते मिलिंद गवळी यांनी या मिलाप सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
8 / 10
या फोटोंमध्ये या दोन्ही मालिकेचे कलाकार धमाल करताना दिसले आहेत. ‘अनुपमा’मधील बाबूजी, वनराज, अनुपमा, काव्या, तर ‘आई कुठे काय करते’ मधील अरुंधती, आई, अनिरुद्ध हे एकमेकांसोबत फोटो काढताना दिसले.
9 / 10
"Anupamaa" & "Aai Kuthe Kaay Karte" Two Sister One mother , एका आईच्या दोन मुली. एक माँ की दो बेटीया, असं म्हणत मिलिंद गवळी यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.