AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिया नाही तर ‘ही’ आहे रणबीर कपूरच्या आयुष्यातील ‘दाल चावल’; त्याच्या कोस्टारनेच केला खुलासा

रणबीर कपूरच्या आयुष्यात आधी बऱ्याच अभिनेत्री येऊन गेल्या. पण आलियासोबत लग्न झाल्यानंतर त्याने एकदा त्याच्या चित्रपटातील ''दाल चावल ही बेस्ट है" असा डायलॉग म्हटल्याचं अनेकदा पाहिलं. पण त्याच्या एका कोस्टारने खुलासा केल्या प्रमाणे आलिया नाही तर दुसरीच व्यक्ती रणबीरच्या आयुष्यातील 'दाल चावल' आहे.

आलिया नाही तर 'ही' आहे रणबीर कपूरच्या आयुष्यातील 'दाल चावल'; त्याच्या कोस्टारनेच केला खुलासा
Dal Chawal of Ranbir Kapoor lifeImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 08, 2025 | 6:16 PM
Share

अभिनेता रणबीर कपूरचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडजलेले होते. पण त्याचा ‘ये जवानी है दिवानी’ मधला एक डायलॉग आजही प्रसिद्ध आहे तो म्हणजे ‘”शादी पचास साल के लिए दाल चावल है जब तक आप मर नहीं जाते… अरे जिंदगी में थोड़ा बहुत कीमा पाव, टंगड़ी कबाब, हक्का नूडल भी होना चाहिए नहीं।” त्यानंतर त्याच चित्रपटाला अनुसरून अजून एक डायलॉग म्हणजे “लेकिन बॉस, जिंदगी के तजुर्बे के साथ देखा जाये तो दाल चावल ही बेस्ट है” दालचावल बेस्ट असल्याचा डायलॉग रणबीरने अनेकदा त्याच्या मुलाखतींमध्येही बोलून दाखवला आहे. रणबीरचा हा डायलॉग ऐकून अनेकांना असं वाटलं असेल की तो आलियाबद्दल बोलत आहे. पण त्याच्या आयुष्यातील दाल-चावल दुसरीच एक व्यक्ती आहे. याचा खुलासा त्याच्याच एका कोस्टारने केला आहे.

सध्या रणबीर रामायण या चित्रपटामुळे चर्चेत आहे

सध्या रणबीर रामायण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच तो या चित्रपटाच्या शुटींगमध्येही व्यस्त आहे. रामायण चित्रपटात कौशल्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री इंदिराने अलीकडेच रणबीर कपूर, जो चित्रपटात रामची भूमिका साकारत आहे, त्याच्याबदद्ल सांगितले. कौशल्याने रणबीर सेटवर कसा वागतो हे देखील सांगितले. इतकेच नाही तर तिने रणबीरच्या आयुष्यातील दाल-चावल कोण आहे हे देखील तिने सांगितलं आहे. त्याच्या आयुष्यातील ती व्यक्ती म्हणजे लाडकी लेक राहा आहे.

रणबीर कपूरचे तिच्यावर प्रचंड प्रेम आहे 

रणबीर कपूरचे त्याची लेक राहावर प्रचंड प्रेम आहे. तो अनेकदा मुलाखतींमध्ये राहाबद्दल बोलत असतो. अगदी आलिया भट्टनेही अनेकदा म्हटले आहे की राहा आल्यापासून रणबीर खूप बदलला आहे. आता रामायण चित्रपटात रणबीरसोबत काम करणाऱ्या इंदिरा कृष्णन यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे आणि त्याला एक चांगला पिता म्हटले आहे.

कोस्टार इंदिरा कृष्णन यांनी केला त्या व्यक्तीचा खुलासा 

इंदिरा म्हणाली की रणबीरने सेटवर तिला कम्फर्ट बनवण्याचा प्रयत्न केला. ती बसल्यावर तो तिची खुर्ची ओढायचा, दररोज तिला तिच्या तब्येतीची विचारपूस करायचा आणि तिच्याशी खूप बोलायचा. इंदिरा म्हणाल्या की त्यांनी कधीही इतक्या मोठ्या स्टारला असे वागताना पाहिले नाही.

ती त्याच्यासाठी दाल-चावलसारखी आहे 

इंदिरा पुढे म्हणाल्या, ‘त्याने मला सांगितले की राहा त्याच्यासाठी दाल-चावलसारखी आहे. तो माझ्या मुलीबद्दल खूप गोड बोलतो जे माझ्या हृदयाला भिडते. तो मला माझ्या मुलाच्या बालपणीच्या पुस्तकांबद्दल विचारतो आणि म्हणतो की त्याला राहासाठीही तीच पुस्तके हवी आहेत. तो दररोज मला विचारतो, मॅम तुम्ही राहासाठी पुस्तके आणलीत का?’

इंदिरा यांनी रणबीरचे केले खूप कौतुक 

एवढेच नाही तर इंदिराने असेही सांगितले की रणबीरचे तिचा मुलगा अनिरुद्धशी देखील एक खास नाते आहे. दोघेही व्हॅनिटी व्हॅनमध्ये तासनतास बोलत असतात. रणबीरच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की तो नेहमीच त्याच्या लाडक्या मुलीसाठी सर्वोत्तम करू इच्छितो. दुसऱ्या एका घटनेबद्दल इंदिरा म्हणाल्या की, एके दिवशी रणबीर खूप शांत बसला होता आणि जेव्हा तिने त्याला विचारले की काय झाले, तेव्हा तो हसला आणि म्हणाला की आज एक शर्यत होती मी राहासाठी धावलो आणि पहिलीही आलो. त्यामुळे त्याचे अंग दुखत होते. पण तरीही तो कामावर आला होता. अशापद्धतीने इंदिरा यांनी रणबीरचे खूप कौतुक केले आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.