AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न तोंडावर असतानाच तारक मेहताचा सोढी बेपत्ता, मोठा खुलासा, गुरूचरण सिंग विमानतळाकडे..

अभिनेता गुरूचरण सिंग हा बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ बघायला मिळाली. असूनही अभिनेत्याला शोधण्यात पोलिसांना यश मिळाले नाहीये. अभिनेत्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासली जात आहेत. गुरूचरण सिंग हा बेपत्ता झाल्यापासून लोक हैराण झाले आहेत.

लग्न तोंडावर असतानाच तारक मेहताचा सोढी बेपत्ता, मोठा खुलासा, गुरूचरण सिंग विमानतळाकडे..
Gurucharan Singh
| Updated on: Apr 28, 2024 | 7:12 PM
Share

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत टप्पू सेनाचे सर्वात आवडते अंकल म्हणजे सोढी अंकल आता बेपत्ता झाले आहेत. तारक मेहता मालिकेत कित्येक वर्षांपासून सोढीचे पात्र साकारणारा अभिनेता गुरूचरण सिंग हा बेपत्ता झाला असून 22 एप्रिलपासून गुरूचरण सिंग हा बेपत्ता आहे. दिल्ली येथून मुंबईला जाण्यासाठी घरातून गुरूचरण सिंग हा निघाला होता. मात्र, तो विमानतळावर पोहचलाच नाही. आता गुरूचरण सिंगचे कुटुंबिय चिंतेते आहेत. दुसरीकडे गुरूचरण सिंगचे अपहरण झाल्याची शंका देखील उपस्थित केली जातंय. पोलिस या प्रकरणात तपास करताना दिसत आहेत. आता नुकताच मोठा खुलासा झालाय.

गुरूचरण सिंग हा लवकरच लग्नबंधनात अडकणार होता. लग्न अवघ्या काही दिवसांवर असतानाच अभिनेता बेपत्ता झालाय. हेच नाही तर रिपोर्टनुसार लग्न तोंडावर असतानाच अभिनेता आर्थिक तंगीत होता. काही दिवसांपासून पैशांची समस्या गुरूचरण सिंगला होती. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच गुरूचरण सिंगने रूग्णालयात उपचार घेतले.

आता पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत. मात्र, लग्न काही दिवसांवरच असतानाच गुरूचरण सिंग बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ बघायला मिळत आहे. गुरूचरण सिंगचा एक सीसीटीव्ही देखील पुढे आलाय. ज्यामध्ये तो रस्त्याने जाताना दिसत आहे. पोलिस या प्रकरणात चाैकशी करताना दिसत आहेत. मात्र, अजूनही अभिनेत्याचे अपहरण झाले का? याबद्दल खुलासा होऊ शकला नाही.

गुरूचरण सिंगने तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका 2020 मध्ये सोडली. त्यापूर्वीच त्याने मालिकेला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र, निर्मात्यांनी परत सोढीच्या भूमिकेसाठी गुरूचरण सिंगला मालिकेत घेतले होते. गुरूचरण सिंग हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतो. जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग गुरूचरण सिंगची बघायला मिळते.

गुरूचरण सिंग हा नेहमीच मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा प्रवास करत असत. अभिनेत्याचे कुटुंब दिल्लीत आहे. यामुळे त्याचे सतत दिल्लीला येणे जावे सुरू असायचे. तारक मेहता मालिका 2020 मध्ये सोडल्यापासून कोणत्याही मालिकेत अभिनय करताना गुरूचरण सिंग हा दिसला नाही. आता या प्रकरणात पोलिसांकडून काही मोठे खुलासे हे केले जाऊ शकतात.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.