Uorfi Javed | नव्या अवतारामुळे पुन्हा ट्रोल झाली उर्फी जावेद, युझर्स म्हणाले –
उर्फी जावेद तिच्या नवनव्या अवतारांमुळे सर्वांनाच हैराण करत असते. तिने नुकतेच काही नवे फोटो शेअर केले असून ते वेगाने व्हायरल होत आहेत.

Uorfi Javed New Look : उर्फी जावेद (Uorfi Javed) ही सध्याची सोशल मीडिया (social media) सेन्सेशन आहे. कोणी तिचं कौतुक करो वा ट्रोलिंग ती थांबत नाही. वेगवेगळी पण अतरंगी वाटणारी डिझाइन्स, तसे कपडे घालणारी उर्फी ही सदैव चर्चेत असते. तिच्या फॅशन सेन्सप्रमाणेच उर्फी तिच्या बेधडक वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. आऊटफिट्सबद्दल नवनवे प्रयोग करताना ती मागेपुढे पहात नाही. रोज काही ना काही नवी पोस्ट, फोटो शेअर करणाऱ्या उर्फीने आजही फॅन्सना निराश केलेले नाही.
तिने आज जो लूक शेअर केला आहे, तो पाहता पाहता बराच व्हायरल झाला आहे. उर्फीने इन्स्टाग्रामवरही काही फोटो आणि एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र त्यामध्ये बऱ्याच जमांचे लक्ष तिच्याकडे न जाता, तिच्या मागे उभ्या असलेल्या तरूणीकडेच जात आहे.
उर्फी चा नवा अतरंगी लुक
या फोटोंमध्ये उर्फीने डेनिम जीन्ससोबत हिरव्या रंगाची फुले घातलेली दिसत आहेत आणि त्यावर डोळ्यांचे चित्रही काढलेले आहे. कर्ली हाय बनसह उर्फीने तिचा लूक तयार केला असून केसांमध्ये काही स्नेक ॲक्सेसरीजही दिसत आहेत. न्यूड लिप शेड आणि आय मेकअपसह तिने हा लूक पूर्ण केला आहे. ही पोस्ट शेअर करतानाच उर्फीने तिच्या या लूकसाठी मदत करणाऱ्या तरूणीचेही आभार मानले आहेत.
View this post on Instagram
उर्फीला कोणी केली मदत ?
उर्फीच्या फोटोमध्ये श्वेता महाडिक देखील दिसली आहे. उर्फीने तिचे आभार मानले आहेत. मात्र हे फोटो शेअर होताच अनेकांचे लक्ष उर्फीकडे कमी आणि तिच्या मागे असलेल्या श्वेताकडेच जास्त आहे. अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

नेहमीप्रणाच उर्फीच्या या पोस्टवर बरेच ट्रोलिंग होताना दिसत आहे. पण काही लोकांनी उर्फीचे कौतुक करत तिच्या हिमतीची दाद दिली आहे.
