AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varun Dhawan : मेट्रोतील लटकंती वरूण धवनला भोवली? किती दंड घेतला? मोठी अपडेट काय?

मेट्रो प्रवासादरम्यान मेट्रो गाडीतील हॅन्डलला लटकल्यामुळे अभिनेता वरुण धवनवर कारवाई करण्यात आली आहे. गाडीतील हॅन्डलला लटकणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचे सांगत अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने त्याला दंड ठोठावला.

Varun Dhawan : मेट्रोतील लटकंती वरूण धवनला भोवली? किती दंड घेतला? मोठी अपडेट काय?
वरूण धवनला किती दंड ?Image Credit source: social media
| Updated on: Jan 28, 2026 | 9:17 AM
Share

‘बॉर्डर 2’ चित्रपटाच्या यशादरम्यान त्यामध्ये प्रमुख भूमिका साकारणारा वरूण धवन मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. खरंतर मेट्रो प्रवासामुळे तो अडचणीत सापडला होता. शनिवारी वरुण धवनने मुंबईत मेट्रोन प्रवास केला. त्याच्या या प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. मात्र मेट्रोमध्ये स्टंट केल्यामुळे वरूण अडचणीत सापडला. मेट्रोत असलेल्या हँडल्सना लटकून त्याने पुल-अप काढायचा प्रयत्न केला आणि हेच त्या व्हिडीओत दिसलं. या कृतीमुळे तो वादात सापडला असून त्याच्यावर कारवाईची टांगती तलवारही लटकत होती. नियमांचे उल्लंघन केल्यामुळेच तो मोठ्या वादात अडकला. त्याला दंडीही ठोठावण्यात आला.

यानंतर मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) ने तोच व्हिडिओ त्यांच्या अकाऊंटवर पोस्ट करत वरूण धवनलची कानउघडणी केली. तसेच वरूण धवनला टॅग करत त्यांनी एक एक सेफ्टी मेसेजही जारी केला होता. ” वरूण धवन. कृपया मुंबई मेट्रोमध्ये हे (स्टंट) करू नका. मित्रांसोबत मेट्रोने प्रवास करणे छान असते हे आम्हाला माहिती आहे, पण हे हँडल्स लटकण्यासाठी बनवलेले नाहीत. मेट्रोमधील पकडण्यासाठी असलेली हँडल्स ही लटकण्यासाठी नव्हे तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असतात. अशा प्रकारची कृत्ये केवळ धोकादायकच नाहीत, तर इतर प्रवाशांना त्रासदायक ठरू शकतात ” असं मुंबई मेट्रोने त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलं होतं. सगळीकडे याचीच चर्चा सुरू झाली आणि अनेक सोशल मीडिया युजर्सनी वरूणला ट्रवोही केलं.

वरूण धवनवर कारवाई ?

दरम्यान मेट्रो प्रवासादरम्यान मेट्रो गाडीतील हॅन्डलला लटकल्यामुळे अभिनेता वरुण धवनवर कारवाई करण्यात आली आहे. गाडीतील हॅन्डलला लटकणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचे सांगत अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वरुण धवन याला 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मेट्रो प्रवासादरम्यान वरूणने गाडीतील हॅन्डलला लटकला आणि हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा टीकेची झोड उठवण्यात आली. वरुणच्या या कृत्यावर एमएमआरडीएनेही नाराजी व्यक्त करून सोमवारी आपल्या एक्स खात्यावर एक पोस्ट टाकली होती. मेट्रो रेल्वे (संचलन व देखभाल) अधिनियम 2002 नुसार हे कृत्य सार्वजनिक उपद्रव निर्माण करणारे असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याला 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

वरूणच्या टीमचे स्टेटमेंट काय ?

दरम्यान याप्रकरणी वरूण धवनच्या टीमने एक स्टेटमेंट जाहीर केला आहे. मेट्रोमध्ये झालेल्या स्टंटनंतर वरूण चर्चेत आला. वरूणला कोणत्याही प्रकारचा दंड किंवा पेनल्टी आकारण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी आधीची पोस्ट काढून टाकली आहे आणि हा गैरसमज दूर करण्यात त्यांच्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, असे त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. या शहराच्या नियमांबद्दल आणि मेट्रो विभागाच्या प्रयत्नांबद्दल वरुणला खूप आदर आहे.यासंदर्भात आता कोणतेही प्रलंबित प्रश्न नाहीत, असही टीमने निवेदनात म्हटलं आहे.

अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय.
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.