AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidya Balan: पार्टीत विद्या बालनचा पदर कोणी खेचला? व्हिडीओ पाहून नाराज झाले चाहते

रेड कार्पेटवर खेचला गेला विद्या बालनचा पदर; Oops मूमेंटचा शिकार होता होता वाचली अभिनेत्री

Vidya Balan: पार्टीत विद्या बालनचा पदर कोणी खेचला? व्हिडीओ पाहून नाराज झाले चाहते
Vidya BalanImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 13, 2022 | 1:30 PM
Share

मुंबई: अभिनेत्री विद्या बालनसोबत नुकतीच अशी घटना घडली, ज्यामुळे ती ‘Oops’ मूमेंटची शिकार झाली असती. गुनीत मोंगा आणि सनी कपूर यांच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये विद्या तिच्या पतीसोबत पोहोचली होती. रेड कार्पेटवर येताना अचानक तिच्या साडीचा पदर एका व्यक्तीच्या हातात अडकला. मात्र त्यानंतर लगेचच विद्याने परिस्थिती हाताळली आणि पापाराझींना फोटोसाठी पोझ दिले.

गुनीत आणि सनीच्या प्री-वेडिंग पार्टीला विद्याने फ्लोरल साडी नेसली होती. पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत तिने रेड कार्पेटवर हजेरी लावली. मात्र त्याच वेळी तिच्यासमोरून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या हातात तिच्या साडीचा पदर अडकला. विद्याने लगेचच तिचा पदर घेतला आणि स्वत:ला सावरून घेतलं. त्यानंतर तिने हसत पापाराझींसमोर पोझ दिले.

पहा व्हिडीओ-

एकीकडे चाहते विद्याचं कौतुक करत आहेत. तिने ज्या पद्धतीने परिस्थितीला हाताळलं, ते कौतुकास्पद आहे, असं नेटकरी म्हणतायत. तर दुसरीकडे तिच्या पतीवर टीका केली जातेय. पत्नीचा पदर अडकला असताना सिद्धार्थ स्वत:च्याच धुंदीत होता, असं नेटकरी म्हणाले. ‘पतीला काहीच फरक पडला नाही. तो इतका कूल कसा काय वागू शकतो’, असं एकाने लिहिलं. तर ‘पती तर वेगळ्याच दुनियेत आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं.

विद्या आणि सिद्धार्थशिवाय या पार्टीला बॉलिवूडमधल्या इतरही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. निर्माता दिग्दर्शक करण जोहर, विशाल भारद्वाज, एकता कपूर, सोनाली बेंद्रे आणि नेहा धुपिया यांसारख्या कलाकारांची मांदियाळी या पार्टीत पहायला मिळाली.

Follow Us
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?