AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय देवरकोंडासोबत फोटो काढणाऱ्या चाहत्याला अत्यंत वाईट वागणूक, अभिनेताही थक्क!

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विजयच्या चाहत्यासोबत गैरव्यवहार झाल्याचं दिसतंय. त्यावरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

विजय देवरकोंडासोबत फोटो काढणाऱ्या चाहत्याला अत्यंत वाईट वागणूक, अभिनेताही थक्क!
विजय देवरकोंडासोबत फोटो काढणाऱ्या चाहत्याला अत्यंत वाईट वागणूकImage Credit source: Twitter
| Updated on: Sep 01, 2023 | 9:51 AM
Share

हैदराबाद | 1 सप्टेंबर 2023 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्याच्या ‘कुशी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. समंथा रुथ प्रभू आणि विजयचा हा चित्रपट आज (1 सप्टेंबर) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यापूर्वी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातील विजयचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विजय त्याच्या चाहत्यांसोबत फोटो काढण्यासाठी स्टेजवर उभा असल्याचं पहायला मिळतं. एक चाहता त्याच्या जवळ येतो आणि फोटो काढण्यासाठी उभा राहतो. मात्र तितक्याच कार्यक्रमाच्या आयोजकांच्या टीममधील एक व्यक्ती संबंधित चाहत्यासोबत गैरव्यवहार करते. हा व्हिडीओ पाहून विजयचे चाहते भडकले आहेत.

विजयसोबत फोटो काढणाऱ्या चाहत्यासोबत गैरव्यवहार

‘कुशी’च्या प्रमोशननिमित्त नुकताच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या शेवटी विजयने काही चाहत्यांसोबत फोटो काढले. मंचावर एक-एक जण येऊन त्याच्यासोबत फोटो काढत होता. एक चाहता विजयसोबत फोटोसाठी उभा असताना अचानक मंचावरील दुसऱ्या व्यक्तीने त्याला मानेनं धरत जोरात पुढे ढकलतो. चाहत्यासोबत अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागणारी ही व्यक्ती कार्यक्रमाच्या आयोजकांच्या टीममधील असल्याचं समजतंय. यावेळी त्याच्या हातात माइकसुद्धा दिसत आहे. ज्याक्षणी तो चाहत्याची मान पकडून त्याला पुढे ढकलतो, तेव्हा त्याच्या बाजूला उभा असलेल्या विजयलाही आश्चर्याचा धक्का बसतो.

पहा व्हिडीओ

भडकले नेटकरी

विजय पुढे काहीच बोलू शकत नाही, कारण त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी दुसरे चाहते लगेच मंचावर येतात. कोणतीही गर्दी नसताना किंवा काही गैरवर्तणूक झाली नसताना चाहत्याला अशा पद्धतीने ढकलणं नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही. हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

विजयने 2022 मध्ये ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये त्याच्यासोबत अनन्या पांडेने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दणक्यात आपटला. आता वर्षभरानंतर त्याचा ‘कुशी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये त्याने समंथा रुथ प्रभूसोबत काम केलं आहे. ट्रेलरमधील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.