विजय देवरकोंडाच्या ‘या’ चित्रपटाची अमेरिकेतही क्रेझ, अॅडव्हान्स बुकिंग; रिलीजआधीच करोडोंचा गल्ला जमला
दक्षिणेचा सुपरस्टार विजय देवरकोंडा बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. विजयच्या 'किंगडम' चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अमेरिकेत या चित्रपटाची क्रेझ आधीच पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून 5 दिवस बाकी आहेत. दरम्यान, उत्तर अमेरिकेत या चित्रपटाची 7000 हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. तर करोडोंचा गल्ला जमवला आहे.

दक्षिणेचा सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा चित्रपट ‘किंगडम’ लवकरच चित्रपटगृहात धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. चित्रपटात विजयचा अॅक्शनपॅक्ड लूक पाहायला मिळणार आहे. विजयचे चाहते या चित्रपटाबद्दल फारच खूप उत्सुक आहेत. चित्रपट रिलीजआधीच त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी अमेरिकेतही अॅडव्हान्स बुकिंग सुरु केलं आहे. नॉर्थ अमेरिकतील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला खूप जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
नॉर्थ अमेरिकेत या चित्रपटाची 7000 हून अधिक तिकिटे अन् कोटींची कमाई
हा चित्रपट अद्याप चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला नाही आणि अमेरिकेत या चित्रपटाची क्रेझ आधीच दिसून येत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून 5 दिवस बाकी आहेत. दरम्यान, नॉर्थ अमेरिकेत या चित्रपटाची 7000 हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. 220 ठिकाणी अॅडव्हान्स बुकिंग करून या चित्रपटाने रिलीजआधीच 1,35,500 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.25 कोटी रुपये कमावले आहेत. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हा चित्रपट आणखी कमाई करू शकतो.
नॉर्थ अमेरिकेत चित्रपटाची क्रेझ
गेल्या काही वर्षांत, उत्तर अमेरिकेत तेलुगू चित्रपटांनी आपली पकड मजबूत केली आहे. ‘बाहुबली’ चे दोन्ही पार्ट, ‘कलकी 2898 एडी’, ‘पुष्पा’ आणि ‘सलार’ सारख्या तेलुगू चित्रपटांनी तेथील कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. तेथील लोकांना तेलुगू चित्रपट खूप आवडताना दिसत आहेत. ते पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने थिएटरमध्ये जात आहेत. आता विजयच्या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग होताना दिसत असून हा चित्रपट तेथे भरपूर कमाई करू शकतो असंच चित्र दिसत आहे.
चित्रपट सेन्सॉरने मंजूर केला
हा चित्रपट विजयच्या कारकिर्दीसाठीही खूप मोठा आहे. विजय या चित्रपटाद्वारे बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे, त्यामुळे त्याच्या चाहत्यांना देखील विजय वेगळ्या रुपात दिसणार आहे. तसेच चित्रपटातही उत्तम अॅक्शन पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलरही आत लाँच होणार आहे. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानेही मान्यता दिली आहे. चित्रपटाची निर्मिती कंपनी सितारा एंटरटेनमेंटने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. कंपनीने 26 जुलै रोजी एक्सवर पोस्ट करून सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती दिली आहे.
विजय देवरकोंडासोबत दिसणार भाग्यश्री बोरसे
गौतम तिन्नानुरी दिग्दर्शित या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत भाग्यश्री बोरसे दिसणार आहे. विजय जेव्हा जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा तो त्याच्या उत्तम अभिनयाने आणि खास शैलीने लोकांची मने जिंकतो. लोकांना या चित्रपटात त्याचा अॅक्शन अवतारही पाहायला मिळणार आहे. विजय ‘किंगडम’मध्ये अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे अनिरुद्ध रविचंदर यांनी यात म्यूजिक दिलं आहे.
