हृतिक-टायगरच्या 'वॉर'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, चार दिवसात सहा विक्रम

बुधवार प्रदर्शित झालेल्या 'वॉर' चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत शंभर कोटींचा आकडा पार केला आहे. रविवारचा सुट्टीचा दिवस आणि मंगळवारी दसऱ्याच्या सुट्टीचा दिवस 'वॉर'च्या कमाईसाठी महत्त्वाचा आहे.

हृतिक-टायगरच्या 'वॉर'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, चार दिवसात सहा विक्रम

मुंबई : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘वॉर’ चित्रपटाने शानदार कमाईचा सिलसिला (War Movie Box Office Collection) कायम ठेवला आहे. पहिल्या चार दिवसांत ‘वॉर’ने 123 कोटींची कमाई केली आहे. त्यासोबतच ‘वॉर’ने बॉक्स ऑफिसवर सहा नवे विक्रम रचले आहेत.

दोन ऑक्टोबरच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’ने पहिल्याच दिवशी तब्बल 51.60 कोटी रुपयांची कमाई केली होती. सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे बुधवारी ‘वॉर’ने तूफान गल्ला जमवला होता.

वॉर चित्रपटाची कमाई

बुधवार, 2 ऑक्टोबर – 51.60 कोटी
गुरुवार, 3 ऑक्टोबर – 23.10 कोटी
शुक्रवार, 4 ऑक्टोबर – 21.30 कोटी
शनिवार, 5 ऑक्टोबर – 27.60 कोटी
एकूण – 123.60 कोटी

याशिवाय तेलुगू आणि तामिळ भाषेत प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’च्या आवृत्त्यांनी चार दिवसांत एकूण 5.25 कोटी रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे सर्व भाषांची मिळून पहिल्या चार दिवसांची कमाई 128.85 कोटी रुपयांवर (War Movie Box Office Collection) गेली आहे.

WAR REVIEW : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा अॅक्शन पॅक्ड ‘वॉर’

बुधवार प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत, तेही वीकेंड संपण्याच्या आधीच शंभर कोटींचा आकडा पार केला आहे. रविवारचा सुट्टीचा दिवस आणि मंगळवारी दसऱ्याच्या सुट्टीचा दिवस ‘वॉर’च्या कमाईसाठी महत्त्वाचा आहे. आठवड्याभराच्या आतच (मंगळवार 8 ऑक्टोबर) दोनशे कोटींच्या घरात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘वॉर’ चित्रपटाचे महत्त्वाचे विक्रम

1. सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा हिंदी चित्रपट
2. 2019 मधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट
3. सार्वजिनक सुट्टीला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट
4. हृतिक रोशनच्या कारकीर्दीतील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट
5. टायगर श्रॉफच्या कारकीर्दीतील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट
6. यशराजच्या इतिहासात सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट

याशिवया तीन दिवसांत 100 कोटींच्या घरात प्रवेश करणारा ‘वॉर’ हा यशराजचा पाचवा चित्रपट ठरला आहे.

2019 मधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट

1. वॉर – 53.35 कोटी
2. भारत – 42.30 कोटी
3. मिशन मंगल – 29.16 कोटी
4. साहो [हिंदी] – 24.40 कोटी
5. कलंक – 21.60 कोटी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *