AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut : कंगना आणि करण जोहर यांच्यातील वाद मिटला?, वाचा सविस्तर

अभिनतेत्री कंगना रनौतचा आगामी चित्रपट ‘थलावी’ मधील चली-चाली हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. आता करण जोहरचा या गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. (Was the dispute between Kangana and Karan Johar settled ?, Karan Johar's video went viral)

Kangana Ranaut : कंगना आणि करण जोहर यांच्यातील वाद मिटला?, वाचा सविस्तर
| Updated on: Apr 05, 2021 | 11:57 AM
Share

मुंबई : अभिनतेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) आगामी चित्रपट ‘थलावी’ (Thalaivi) मधील चली-चाली (Chali Chali) हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. यात कंगनानं केलेल्या कामाला प्रचंड पसंती मिळत आहे. हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे ज्यात प्रत्येकजण या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. आता या गाण्यावर अनेकांनी व्हिडीओज तयार केले आहेत आणि हे व्हिडीओ कंगनानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. दरम्यान,एका चाहत्यानं करण जोहरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो नाचतांना दिसतोय. हा व्हिडीओ जुना आहे मात्र एका फॅननं त्यात कंगनाचं गाणं एडिट केलं आहे.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओवर कंगनाची प्रतिक्रिया

कंगनानंही हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिलं आहे की,’हा मी पाहिलेला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट व्हिडीओ आहे. मी आता यावर करणची काय प्रतिक्रिया असेल याची वाट बघतेय.’

गाण्याच्या चित्रिकरणासाठी खास मेहनत

कंगनानं या गाण्यात धबधब्यात आपला बोल्ड अंदाज दाखवला आहे. गुलाबी कलरच्या साडीत कंगनानं चाहत्यांचं मन जिंकेलंय. सोबतच यात कंगना पुन्हा वेस्टर्न लूकमध्ये दिसली होती आणि काही मुलांबरोबर नाचतानाही दिसली. या संपूर्ण गाण्यात कंगनाने जयललिता यांचे फिल्मी जीवन दाखवले आहे. अशी चर्चा आहे की या गाण्याच्या शुटिंगसाठी कंगना 24 तास पाण्यात होती. हे गाणं संधवी प्रकाश यांनी गायलं असून संगीत जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी दिले आहे. गीत इरशाद कामिल यांनी लिहिलं आहे.

‘थलायवी’साठी कंगनाची मेहनत

‘थलायवी’ या चित्रपटासाठी कंगनाने अथक मेहनत घेतली आहे. कथेच्या आणि पात्राच्या मागणीनुसार कंगनाला वजन वाढवावं लागलं होतं. यावेळी, सर्वात मोठे आव्हान होते की, तिला नव्या चित्रपटासाठी पुन्हा एकदा स्लीमट्रीम व्हायचे होते. अशा परिस्थितीत कंगनाने खूप कठोर मेहनत केली. खुद्द कंगना रनौत हिने आपल्या ट्विटमध्ये याचा खुलासा केला आहे. ट्रेलर प्रदर्शनाच्या वेळे तिने लिहिले की, ‘काही महिन्यांत, 20 किलो वजन वाढवणे आणि घटवणे कदाचित सर्वात मोठे आव्हान नव्हते. काही तासांत ही आपली प्रतिक्षा संपणार आहे आणि त्यानंतर जया कायमची तुमची असेल.’

संबंधित बातम्या

Kapil Sharma | कपिल शर्माच्या मुलाचं नाव ऐकलंत का? ‘या’ नावाचा ‘विजया’शी आहे खास संबंध!

Akshay Kumar | कोरोनाची लागण झालेल्या ‘खिलाडी’ कुमारची तब्येत खालवली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल!

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.