जेव्हा 30 वर्षीय ईशा देओल पहिल्यांदाच सावत्र आईला भेटली; प्रकाश कौर यांनी तिला पाहताच काय केलं?
धर्मेंद्र यांचे आयुष्य हे नेहमीच गुंतागुंतीचं राहिलं आहे. त्यांनी दोन लग्न केली, जेव्हा त्यांची मुलगी ईशा देओल वयाच्या 30 व्या वर्षी पहिल्यांदाच सावत्र आई प्रकाश कौर यांना भेटली तेव्हा नेमकं काय घडलं होतं? तसेच ते कारण काय होतं? जेव्हा 30 वर्षानंतर ईशा त्यांच्या समोर आली तेव्हा प्रकाश कौर यांनी पहिल्यांदा काय केलं? जाणून घेऊयात.

धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादळी आणि चर्चेत राहिलेलं आहे. जेव्हा त्यांनी हेमा यांच्याशी दुसरं लग्न केलं तेव्हा तर सर्वत्र फक्त त्यांचीच चर्चा होती. यावेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या आग्रहावरून धर्मेंद्र यांनी प्रकाश कौरशी यांच्याशी लग्न केले. या लग्नातून त्यांना चार मुले आहेत, सनी देओल, बॉबी देओल, अजेता आणि विजेता. लग्नानंतर आणि वडील झाल्यानंतर धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. वयाच्या 45 व्या वर्षी हेमन त्यांच्या स्वप्नातील गर्ल हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. चित्रपटांमध्ये एकत्र काम करत असताना, दोघे जवळ आले. वयाच्या 45 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीशी दुसरे लग्न केले, परंतु त्यांनी त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरशी घटस्फोट घेतला नाही.
हेमा आणि प्रकाश कौर कधीही भेटल्या नाहीत
धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी लग्न करता यावे यासाठी त्यांनी धर्मही बददला. या लग्नापासून त्यांना दोन मुली आहेत, ईशा देओल आणि अहाना देओल. अभिनेत्याने आयुष्यभर त्यांच्या दोन्ही कुटुंबांला सारखंच प्रेम देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही कुटुंबाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या सांभाळली. परंतु प्रकाश कौर किंवा हेमा मालिनी कधीही एकमेकींना भेटल्या नाहीत. नाही हेमा कधी त्यांच्या घरी गेल्या. प्रकाश कौर धर्मेंद्र यांच्या वडिलोपार्जित घरात तिच्या मुलांसह राहतात, तर हेमा नेहमीच त्यांच्या मुलींसह वेगळी राहिल्या.
ईशा देओल 30 वर्षांत पहिल्यांदाच तिच्या सावत्र आईच्या घरी गेली
ईशा देओल आणि अहाना देओल देखील लहानपणापासून प्रकाश कौर यांना भेटल्या नव्हत्या.पण एक प्रसंग असा आला की त्यावेळी ईशाचा तिची सावत्र आई प्रकाश कौर यांच्याशी भेटण्याचा योग जुळून आला तेही वयाच्या 30 व्या वर्षी. ईशा देओलच्या आयुष्यात पहिली संधी आली जेव्हा तिने तिच्या सावत्र आईच्या घरी पाऊल ठेवले आणि यासाठीची सर्व व्यवस्था तिचा सावत्र भाऊ सनी देओलने केली होती.
View this post on Instagram
ईशाने सावत्र आईला भेटण्याचं नेमकं कारण काय?
हेमा मालिनी यांनी त्यांच्या आत्मचरित्र “हेमा मालिनी – बियाँड ड्रीम गर्ल” मध्ये ही घटना मांडली आहे. ही घटना 2015 मध्ये घडली. 2015 मध्ये, धर्मेंद्र यांचे मोठे भाऊ, अभिनेता अभय देओल यांचे वडील अजित देओल आजारी होते. त्यावेळी ईशा आणि अहानाला त्यांना भेटायचे होते. अजित देओलवर धर्मेंद्र यांच्या घरीच उपचार सुरू होते. यादरम्यान, ईशा देओलने तिचा सावत्र भाऊ सनी देओलला फोन करून सांगितले की तिला काकांना भेटायचे आहे. तसेच त्याचनिमित्ताने जवळजवळ 30 वर्षांनंतर ईशा तिची सावत्र आई प्रकाश कौर यांना भेटणार होती. त्याबद्दलची सर्व काळजी सनी देओलने घेतली होती.
ईशाला पाहिल्यावर प्रकाश कौर यांनी काय केलं?
ईशाची प्रकाश यांच्याशी ही पहिलीच भेट होती. हेमा मालिनी यांच्या पुस्तकात ईशाने सांगितलेला हा प्रसंग देखील आहे की, ईशाने या पहिल्या भेटीचे वर्ण करताना म्हटले की, “मी त्यांच्या पायांना स्पर्श केला आणि त्यांनीही मला मोठ्या मनाने आशीर्वाद दिला.”. तसेच ईशा आणि अहानाचे त्यांचे सावत्र भाऊ सनी देओल आणि बॉबी देओल यांच्याशी खूप खास बॉंड आहे. दोन्ही भाऊ बहिणींना नेहमी सपोर्ट करतात असंही ईशाने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
