संजय दत्तला सांगा मला विसरुन जा, सर्व काही…, तेव्हा माधुरीने संजूबाबाच्या बहिणीला फोन केला आणि…
Madhuri Dixit And Sanjay Dutt: 'संजय दत्तला सांगा मला विसरुन जा, सर्व काही...', जेव्हा सर्वत्र होत्या संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा, 'त्या' प्रसंगानंतर माधुरीने संजूबाबाच्या बहिणीला फोन केला आणि..., आजही संजूबाबा आणि माधुरी दीक्षित यांच्या नात्याच्या चर्चा रंगलेल्या असतात.

Madhuri Dixit And Sanjay Dutt: अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि संजय दत्त आज त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात फार पुढे गेले आहेत. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी आणि संजय यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगल्या. माधुरी दीक्षित अशा अभिनेत्रींपैकी एक होती, जिच्यावर फक्त चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील फिदा होते. अनेक अभिनेत्यांसोबत माधुरीच्या नावाची चर्चा देखील रंगली. माधुरीच्या नावाची चर्चा अनेकांसोबत रंगली, पण अभिनेता संजय दत्त याच्यासोबत तुफान चर्चा रंगल्या. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आली.
माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या नात्याची चर्चा फाक्त बॉलिवूडमध्ये नाही तर, चाहत्यांमध्ये देखील रंगू लागली. संजूबाबा विवाहित असल्याचं माहिती असताना देखील माधुरी, संजूबाबाच्या प्रेमात होती. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन देखील शेअर केली. ‘साजन’ सिनेमात दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. ‘खलनायक’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दोघांच्या रिलेशिनशिपच्या चर्चांनी जोर धरला.
अभिनेत्रीच्या कुटुंबियांच्या संजूबाबा याच्यासोबत असलेल्या नात्याला विरोध होता. कारण संजय याचं लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगी देखील होती. असं असताना देखील माधुरीने फक्त तिच्या मनाचं ऐकलं. पण माधुरी आणि संजय यांचं प्रेम प्रकरण फार काळ टिकलं नाही. 1993 मध्ये जेव्हा बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात संजूबाबाचं नाव आलं, तेव्हा माधुरीने संजय दत्तपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
तेव्हा एका मॅगझीनमध्ये संजूबाबा आणि धकधक गर्ल यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेक चर्चा देखील रंगल्या होत्या. ज्यामध्ये लिहिण्यात आलं होतं की, माधुरी हिने संजूबाबाच्या बहिणीला फोन केला आणि सांगितलं, ‘संजय दत्तला सांगा मला विसरुन जा, आता सर्व काही संपलेलं आहे…’, त्यानंतर दोघे कधीच एकत्र दिसले नाही.
पण अनेक वर्षांनंतर माधुरी दीक्षित आणि संजय दत्त ‘कलंक’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आले. आज दोघे देखील त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. माधुरी हिने डॉ. नेने यांच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्रीला दोन मुलं देखील आहेत. माधुरी कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे आणि कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
संजूबाबा याच्याबद्दल सांगायचं झालं, अभिनेता तिसरी पत्नी मान्यता दत्त हिच्यासोबत आणि जुळ्या मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. अभिनेत्याचे कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, संजूबाबा आजही अभिनय विश्वात सक्रिय आहे. अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आजही असतात.
