‘तांडव’ वेब सीरीजचा वाद कधी थांबणार? वाचा आतापर्यंत काय घडलं…

‘तांडव’ (Tandav) या वेब सीरिजमधून हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे होत असलेल्या चौफेक टीकेनंतर ‘तांडव’चे निर्माते अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) यांनी माफी मागितली आहे.

‘तांडव’ वेब सीरीजचा वाद कधी थांबणार? वाचा आतापर्यंत काय घडलं...

मुंबई : ‘तांडव’ (Tandav) या वेब सीरिजमधून हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे होत असलेल्या चौफेक टीकेनंतर ‘तांडव’चे निर्माते अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) यांनी माफी मागितली होती. मात्र, अली अब्बास जफरने माफी मागूनही काही विशेष फरक पडलेला दिसत नाही. कारण अली अब्बास जफरच्या माफीनंतरही उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशमध्ये तांडव बेव सीरीजच्या निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचदरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी केवळ माफी मागून चालणार नाही. आम्ही अॅमेझॉनसहीत सर्वांना तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे. (When will the controversy over ‘Tandav’ web series stop?)

राम कदम यांनी तसं ट्विटही केलं आहे. जोपर्यंत मुंबई पोलीस एफआयआर दाखल करत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवू असा इशाराही त्यांनी दिला होता. बहुजन समाज पार्टी (बसपा) च्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनीही ‘तांडव’ या वेब सीरीजमधील आक्षेपार्ह देखावे आणि संवाद काढावा असे आवाहन निर्मात्यांना केले आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सोमवारी ट्वीट केले होते.

तांडव विरोधात विविध शहरांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. दिल्ली, मुंबई आणि लखनऊमध्ये तांडवच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी लखनऊ पोलिसांच्या चार अधिकाऱ्यांची एक टीम मुंबईलाही रवाना झाली. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

निर्मात्याने काय म्हटलं
ही वेब सीरिज पूर्णपणे फिक्शन आहे. या सीरिजमधील घटनेचा कोणत्याही जिवीत व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असलास तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची विना अट माफी मागत आहोत, असं जफर यांनी म्हटलं आहे.

अॅमेझॉनच्या उत्तराची प्रतिक्षा
जफर यांनी माफी मागितली असली तरी अजूनही अॅमेझॉनवर ही सीरिज दाखवली जात आहे. या सीरिजचे सर्व हक्क अॅमेझॉनकडे आहेत. त्यामुळे सरकार आणि आक्षेप घेणाऱ्यांना उत्तर देण्याची जबाबदारी अॅमेझॉनवर असून अॅमेझॉन काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या : 

जिया खानच्या बहिणीनंतर, ‘या’ अभिनेत्रीचे साजिद खानवर गंभीर आरोप!

हे पोस्टर नाही ‘जाळ’ आहे, दिव्या दत्ताचा ‘अवतार’ खरंच धाकड आहे !

(When will the controversy over ‘Tandav’ web series stop?)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI